आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस नेते म्हणाले, शहांना तणावामुळे झाला स्वाइन फ्लू, कर्नाटकातील सरकार पाडले तर उलट्या-जुलाब लागतील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेंगळुरू - कर्नाटकातील काँग्रेसचे खासदार बीके हरिप्रसाद यांनी भाजपाध्यक्षांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हरिप्रसाद म्हणाले शहांना तणावामुळे स्वाइन फ्लू झाला आहे. त्यांनी जर काँग्रेस-जेडीएसचे सरकार पाडले तर त्यांना उलट्या आणि जुलाबही लागेल. भाजपने मात्र या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, काँग्रेसने या प्रकरणी माफी मागायला हवी. 

 

पक्षाच्या कार्यक्रमात हरिप्रसाद म्हणाले, अमित शहांना तणावामुळे ताप आला. काँग्रेसचे काही आमदार परत आले म्हणून त्यांना ताप आला. पण जर त्यांनी काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार पाडले तर त्यांना उलट्या आणि जुलाबही लागतील. त्याचमुळे त्यांना स्वाइन फ्लू झाला आहे. गुरुवारी काँग्रेसने भाजपवर घोडेबाजाराचा आरोप करत बेंगळुरूमध्ये आंदोलन केले होते. 


भाजपने म्हटले, काँग्रेसची संस्कृती 
भाजपा नेते संबित पात्रा म्हणाले की, हरिप्रसाद यांचे वक्तव्य वाईट आहे. हे काँग्रेसची संस्कृती दाखवते. राहुल गांधी म्हणतात की, त्यांचा पक्ष प्रेम पसरवत आहे. पण त्यांच्या पक्षात प्रेम पसरवण्याची हीच संस्कृती आहे का? काँग्रेसने यासाठी माफी मागायला हवी. 


शहांना श्वास घेण्यास त्रास 
अमित शहा यांना बुधवारी रात्री नऊ वाजता छातीत वेदना आणि श्वास घेण्यास त्रास झाला. त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...