आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Controversial Statement News In Marathi, Politics

ANALYSIS: मते मिळविण्यासाठी वादग्रस्त वक्तव्ये, असा आहे प्रचाराचा अनोखा फंडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा टप्पा जसा जवळ आला तशी वादग्रस्त वक्तव्यांमध्ये वाढ झाली आहे. आपल्या नावावर एखादा वाद ओढवून घ्यायचा आणि स्वतःला लाईम लाईटमध्ये आणायचे, अशी निवडणूक प्रचाराची अनोखी पद्धत रुजू होताना दिसून येत आहे. ही वादग्रस्त वक्तव्ये करताना एखाद्या समाजाचा किंवा समूहाचा त्याला पाठिंबा असावा, एवढा सोपा ताळमेळ यावेळी ठेवला जात आहे. परंतु, या वक्तव्यांमुळे खरेच मते मिळतात... समाजाचा एखादा घटक नेत्यांकडे आकर्षित होतो... नेते माथेफिरू असल्याचे सिद्ध तर होत नाही... समाजाचा विश्वास तर नेते गमावून बसत नाहीत, असे अनेक तर्क आहेत. त्यावर अजून ठोस निष्कर्ष निघालेला नसला तरी भावनिक वाद असला तर निवडणुकीत लाभ होतो, हे मात्र सिद्ध झाले आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन-तीन दशके कॉंग्रेसची पाळेमुळे भारतीय समाजमनात खोलवर पसरलेली होती. परंतु, त्यानंतर पकड सैल होत असल्याचे लक्षात आल्यावर भावनिक मुद्दे मांडून त्यांचे रुपांतर मतदानात करण्याचा हुकमी प्रयोग करण्यात आला, असे राजकीय विश्लेषक सांगतात. याचे उदाहरण घ्यायचे तर इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर कॉंग्रेसला विक्रमी मतदान झाले होते. त्यामुळे भावनिक मुद्द्यांचा लाभ होतो हे दिसून येते. परंतु, वादग्रस्त वक्तव्यांचा लाभ होतो, की नाही हे अद्याप सिद्ध झालेले नाही. येत्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर निश्चितच ते सिद्ध होईल, यात काही दुमत नाही.
काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जात होते. परंतु, आता निवडणुकीच्या धामधुमीत वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या नवख्यांनी दिग्विजयसिंह यांनाही मागे टाकले असून वादाला प्रचाराचे साधन केले आहे. यांना नया है वह... असे म्हणायची सोयही नाही. एवढे त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखविले आहे. यात महाराष्ट्रातील नेते मंडळीही मागे नाहीत.
विवाहबाह्य संबंध वाईट, अशा लोकांना दगडांनी ठेचून ठार मारायला हवे, म्हणाले अबू आझमी.... वाचा पुढील स्लाईडवर