आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ड्रीम गर्ल'चे दिग्दर्शक राज शांडिल्यचे स्वरा भास्करबद्दल आक्षेपार्ह्य वक्तव्य, म्हटले -‘सस्ती बिकने वाली हीरोइन’, नंतर मागितली माफी

2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • राज यांनी दैनिक भास्करचे नाव जबरदस्तीने ओढले, भास्करच्या तीव्र विरोधानंतर दोघांचीही जाहीर माफी मागावी लागली.
 • सीएएवर आपले विचार व्यक्त करताना राज शांडिल्य यांनी ट्विटमध्ये म्हटले होते- स्वरा भास्करपेक्षा महागडा विकला जातो दैनिक भास्कर.

बॉलिवूड डेस्क. (अमित कर्ण): सीएए, एनआरसी आणि जेएनयू या विषयावरील विचारसरणीची लढाई बॉलिवूडमध्येही जोरदार दिसत आहे, परंतु या विचारसरणीच्या लढाईत बॉलिवूडचे दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी मर्यादा ओलांडली आहे. त्यांनी फेसबुकवर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करला विक्री होणारी स्वस्त वस्तू असे  संबोधले आहे आणि दैनिक भास्कर वृत्तपत्राचा या तुलनेत जबरदस्तीने उल्लेख केला. त्यांनी ट्विटरवर लिहिले की- “स्वस्त वस्तूंकडे लक्ष देऊ नका, स्वरा भास्करपेक्षा महागडा दैनिक भास्कर विकला जातो.”


जेव्हा दैनिक भास्कर यांनी राज शांडिल्य यांच्या या अप्रिय वक्तव्यावर आक्षेप घेतला, तेव्हा त्यांनी प्रथम स्वरा भास्कर व नंतर दैनिक भास्करची आपल्या ट्विटर हँडलवर जाहीर माफी मागितली. स्वराने या वक्तव्यांवर आपला आक्षेप नोंदविला आणि आपल्या पोस्टचा स्क्रीनशॉट घेऊन ट्विट केले.


राज शांडिल्यांशी थेट बातचित : एका महिलेचा स्वस्त वस्तू म्हणून उल्लेख करणे, ही कोणती भाषा आहे?

 • प्रश्नः विरोधी विचारधारेवर अशी निंदा करणे किती प्रमाणात योग्य आहे?

उत्तरः 'हे असं अजिबात असू नये. स्वरासाठी फक्त तो माझा दृष्टिकोन होता. '

 • प्रश्नः एखादी अभिनेत्रीला स्वस्त वस्तू म्हणणे आणि देशातील सर्वात प्रतिष्ठित वृत्तपत्राचे नाव यात बळजबरीने ओढणे ही तुमची कशी भाषा आहे?

उत्तरः मी कोणाच्याही चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केला नाही.  मी तिचे मानसिक विचार व्यक्त करीत होतो. "जर स्वराला माझे म्हणणे योग्य वाटले नसेल तर मी त्यांच्याकडे मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.' मी त्यांना पुर्वपासून ओळखत आहे. मी स्वराला ड्रीम गर्लमध्ये निधी बिष्टच्या भूमिकेत घेणार होतो. स्वरा ही एक चांगली अभिनेत्री आहे. तिला हर्ट करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता.

 • प्रश्नः तुम्ही चित्रपट दिग्दर्शक आहात. अशा खालच्या दर्जाच्या शब्दांत तुम्ही तुमचे म्हणणे मांडू शकत नाही?

उत्तरः माझे फॉलोअर असाल तर मी बर्‍याचदा चांगल्या गोष्टी बोलतो. मी हिंदू-मुस्लिम बांधव आहेत हे देखील बोलतो. त्याला फॉलोअर्स का फॉलो करत नाहीत? मी नकारात्मक बोललो नाही.

 • प्रश्नः कायद्याच्या आधारेही आपले विधान आक्षेपार्ह मानले जाईल?

उत्तरः मी ट्विटरवर काहीही बोललो नाही, मी फेसबुकवर बोललो होतो. ट्विटरशी काही संबंध नाही.

 • प्रश्नः दैनिक भास्कर हे एक प्रतिष्ठित वृत्तपत्र आहे. त्याचा अशा प्रकारे उल्लेख करण्याची परवानगी नाही?

उत्तरः मी भास्कर व्यवस्थापनाला पत्र लिहून याबद्दल दिलगिरी व्यक्त करणार आहे. माफी मागण्यात कोणतीही हानी नाही.

 • प्रश्न: विक्री हा अवमानकारक शब्द आहे. तुम्ही एका स्त्रीबद्दल आक्षेपार्ह्य वक्तव्य केले आहे. हे कुणीही अजिबात सहन करू शकत नाही?

उत्तरः यासाठी मी आता सोशल मीडियावर जाहिरपणे पोस्ट करून दैनिक भास्कर आणि स्वरा यांची दिलगिरी व्यक्त करतो.

 • प्रश्नः आपण सहमत आहात की आपल्या हातून चूक झाली आहे?

उत्तर: होय, मी सहमत आहे. मी काय लिहिले त्याबद्दल मी स्वत: ला जबाबदार मानतो. समोरच्या व्यक्तीला याबद्दल काय वाटले?, त्याबद्दल मी काय बोलणार. सध्या मला याबद्दल काही इश्यू नाही. 

 • प्रश्नः या संभाषणात तुमचा कबुलीजबाब आहे काय?

उत्तरः तू मला बर्‍याच काळापासून ओळखतोस. मी महिलाविरोधी नाही. माझ्या चित्रपटातच संवाद  आहे की, महिला पुरुषांपेक्षा पुढे राहिल्या आहेत. मग ती सीता असो की द्रौपदी. मी तिथे त्यांना अॅप्रिशिएटच केले आहे.

 • प्रश्नः तुम्ही संवाद नक्कीच कितीही चांगले लिहिले असतील, पण मंगळवारी तुम्ही केलेले विधान हे योग्य नव्हते?

उत्तरः भारतात चांगल्या गोष्टी प्रतिबिंबित होतात. पहा, जेएनयूमध्ये बरेच काही घडले. चूक झाली पण तपास न करता स्वरा कोणालाही दोष देत होती. ते मला न्याय्य वाटले नाही. माझेही दोन दृष्टिकोन होते. होय, परंतु लिहिण्यात फरक आहे.