आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत परंपरेमुळे बुवाबाजी वाढली का? या विषयावरून साहित्य संमेलनात गोंधळ, व्यासपीठावर परिसंवादावेळी वाद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - उस्मानाबाद येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्याच भाषणावेळी वाद उफाळला. संत परंपरेमुळे बुवाबाजी वाढली का? या विषयावर परिसंवाद सुरू असताना काही लोकांनी त्यावर आक्षेप घेतल्याने हा गोंधळ झाला. गोंधळानंतर परिसंवादास पुन्हा सुरुवात


93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर गोंधळ उडाला. समाजात संत परंपरेमुळे बुवाबाजीचे प्रस्थ वाढले का? या विषयावरून व्यासपीठावर परिसंवाद होत होता. या दरम्यान काही लोकांनी अचानक व्यासपीठावर येऊन परिसंवाद बंद पाडला. या लोकांनी तुम्ही एका विशिष्ट धर्माच्या विषयावर परिसंवाद का करता याविषयी विचारणा केली. तसेच साहित्य संमेलन बंद पाडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान काही वेळानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या गोंधळानंतर परिसंवाद पुन्हा सुरळीत सुरू झाला. 

बातम्या आणखी आहेत...