आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्ताने भरलेले सॅनिटरी पॅड मित्राच्या घरी न्याल का? मग ते मंदिरात कशासाठी न्यायचे? स्मृती इराणींचे वादग्रस्त विधान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - शबरीमाला येथील मंदिरामध्ये 10 ते 50 वयोगटातील मुली आणि महिलांना प्रवेशाच्या मुद्द्यावरून सध्या चांगलेच वादळ पेटले आहे. त्यात आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या एका वक्तव्यावरून नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. तुम्ही रक्ताने भरलेले सॅनिटरी पॅड मित्राच्या घरी नेता का, मग ते मंदिरात काय न्यायचे? असा उल्लेख असणाऱ्या त्यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र या वादानंतर स्मृती इराणी यांनी फेक न्यूज असल्याचे ट्वीट केले आहे. 


काय म्हणाल्या स्मृती इराणी 
आपल्याला प्रार्थना करण्याचा अधिकार आहे, पण अपमान करण्याचा काहीही अधिकार नाही. मी सध्या केंद्रीय मंत्रिमंडळाची सदस्य आहे. त्यामुळे मला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाविरोधात बोलण्याचा अधिकार नाही. पण तुम्ही रक्ताने भरलेले सॅनिटरी नॅपकीन मित्राच्या घरी नेता का? मग ते देवाच्या मंदिरात कशाला न्यायचे असा सवाल स्मृती इराणी यांनी केला आहे. चला पाहुयात त्यांचा हा व्हिडिओ...

#WATCH Union Minister Smriti Irani says," I have right to pray,but no right to desecrate. I am nobody to speak on SC verdict as I'm a serving cabinet minster. Would you take sanitary napkins seeped in menstrual blood into a friend's home? No.Why take them into house of God?" pic.twitter.com/Fj1um4HGFk

— ANI (@ANI) October 23, 2018

 

स्मृती म्हणाल्या, फेक न्यूज..
एका व्यक्तीने स्मृती यांच्या या वक्तव्याबाबत एक ट्वीट केले. त्याला उत्तर देताना स्मृती यांनी ही फेक न्यूज असल्याचे म्हटले.. पाहा त्यांचे ट्वीट...

Fake news ...... calling you out on it. Will post my video soon. https://t.co/ZZzJ26KBXa

— Smriti Z Irani (@smritiirani) October 23, 2018

 

बातम्या आणखी आहेत...