कॅन्सर निदान व / कॅन्सर निदान व उपचार हाेणार अाता सोयीस्कर; नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय आणि जपायगो संस्थेचा संयुक्त उपक्रम

संदर्भ सेवा रुग्णालयात या उपक्रमाचे उद‌्घाटन डाॅ. तायडे यांच्या हस्ते

प्रतिनिधी

Dec 14,2018 09:56:00 AM IST

नाशिक- असंसर्गरोग जसे उच्च रक्तदाब मधुमेह व कॅन्सर पूर्वी वयाच्या चाळिशीनंतर आढळत असे, अाता मात्र हे सर्व आजार तिशीच्या अातील व्यक्तींना हाेत असल्याचे अाढळत अाहे. या आजारांचे लवकरात लवकर निदान होणे व त्यावर त्वरित उपचार देणे महत्त्वाचे अाहे. हा उपक्रम सरकारी संस्था अाणि स्वयंसेवी संस्थांनी संयुक्तपणे राबविल्यास लाभदायी ठरणार असल्याचे मत राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या सहसंचालक डॉ. साधना तायडे यांनी व्यक्त केले.

कॅन्सरचे निदान व त्यावर तत्काळ उपचार हा उपक्रम जिल्हा रुग्णालय आणि जपायगो या सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात अाला अाहे. संदर्भ सेवा रुग्णालयात या उपक्रमाचे उद‌्घाटन डाॅ. तायडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. तायडे बोलत होत्या. धावपळीचे जीवन आणि धूम्रपान, रासायनिक पद्धतीने पिकवलेले अन्न व धान्य यामुळे कॅन्सर हाेत असून त्याचे प्रमाण वाढत चालले अाहे. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर सर्वसामान्य रुग्णाला उपचारपद्धती देण्यासाठी जपायगो ही संस्था जिल्हा रुग्णालयासाेबत काम करत अाहे. सर्व असंसर्ग रोगांचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात होणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात तो लवकर बरा होते, असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले.

याप्रसंगी उपसंचालिका डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक तथा संदर्भ रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, मानवता क्युरी सेंटरचे डॉ. राज नगरकर, स्त्रीरोगतज्ज्ञ संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संकलेचा, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. नामपल्ली, नामको कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक, जपायगो संस्थेचे राज्य समन्वयक डॉ. पराग भांबरे, डॉ. चिनार पाटील,उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, एनसीडी विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. सूत्रसंचालन डॉ. नीलेश पाटील यांनी केले. प्रास्ताविक डॉ. शिल्पा बांगर यांनी केले.

कॅन्सर स्क्रिनिंगमध्ये आढळले १७ टक्के रुग्ण
जिल्ह्यात मौखिक आरोग्य तपासणीमध्ये १७ टक्के कॅन्सर हे मौखिक, तर २० टक्के स्तनाचे अाणि १६ गर्भशय मुखाचे, तर इतर ३९ टक्के इतर कॅन्सरचे रुग्ण अाहेत.

X
COMMENT