आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Convict Pawan Gupta|Rapists Death Warrant|Nirbhaya Case Convict Pawan Kumar Curative Petition|Latest News And Updates On Pawan Has Moved Supreme Court Seeking A Direction That His Curative Petition Be Heard In An Open Court

चारही दोषींची फाशी तिसऱ्यांदा लांबणीवर, निर्भयाची आई म्हणाली - आमची व्यवस्था गुन्हेगारांना मदत करणारी ठरली

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील चारही आरोपींची फाशी तिसऱ्यांदा लांबणीवर गेली आहे. पतियाळा कोर्टाने पुढील आदेश येईपर्यंत फाशीला स्थगिती दिली आहे. पवन गुप्ता या आरोपीची दया याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित असल्यामुळे कोर्टाने हा निर्णय दिला. आरोपींची फाशी टळण्याची ही तिसरी वेळ आहे. पवनने सोमवारी सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पेटिशन रद्द झाल्यानंतर तत्काळ दया याचिका दाखल केली होती. दोषीच्या वकिलांनी राष्ट्रपतींचा निर्णय येईपर्यंत डेथ वॉरंट थांबवण्यात यावा असा युक्तिवाद केला.निर्भयाची आई म्हणाली...


फाशीला स्थगिती दिल्यानंतर निर्भयाची आई म्हणाली की, वारंवार शिक्षा थांबवणे यंत्रणेतील अपयश दर्शवते. आमची संपूर्ण व्यवस्था गुन्हेगारांना मदत करणारी ठरली आहे. तिसर्‍या वेळी जाहीर झालेल्या डेथ वॉरंटमध्ये निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याची तारीख 3 मार्च रोजी सकाळी 3 वाजता निश्चित करण्यात आली होती.पतिळा हाउस कोर्टात झाले असे...

दोषी अक्षय सिंहने मंगळवारी सकाळी 6 वाजता होणारी फाशी थांबवा ढकला अशी मागणी करणारी याचिका केली होती. सत्र न्यायालयाने त्यावर मंगळवारी सुनावणी घेत याचिका फेटाळून लावली. अक्षयने सुद्धा शनिवारी राष्ट्रपतींकडे दया याचना करणार असे म्हटले होते. विनय शर्मा, मुकेश सिंह, पवन गुप्ता आणि अक्षय सिंह या चारही दोषींनी आपल्या सर्वच कायदेशीर पर्यायांचा वापर केला. कोर्टाने दोषींकडून झालेल्या क्यूरेटिव्ह आणि दया याचिकेला झालेल्या विलंबावर सुद्धा वकिलांना फटकारले. दोषी पवनचे वकील एपी सिंह यांना उद्देशून बोलताना "कुठूनही एकही चुकीचा पाउल उचलला गेल्यास चूक तुमची असेल. तुम्ही आगीशी खेळत आहात. सावध व्हा." असे न्यायालयाने सांगितले. यानंतर तिहार प्रशासनाने आपली बाजू मांडली. त्यानुसार, दया याचना दाखल झाल्यानंतर आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद तुरुंग प्रशासनाकडूनच स्टेटस रिपोर्ट मागतील. त्यामुळे, फाशीला आपो-आप स्थगिती येईल. आता चेंडू सरकारच्या कोर्टात आहे. यामध्ये कोर्टाची भूमिका राहिलेली नाही.


तत्पूर्वी दिल्लीच्या निर्भया प्रकरणातील दोषी 4 दोषींपैकी एक पवनची क्युरेटिव्ह पेटिशन सुप्रीम कोर्टाने सोमवारी फेटाळून लावली. पवनने फाशीला जन्मठेपेत बदलण्याची विनंती केली होती. पवनचे वकील एपी सिंह यांनी रविवारी म्हटले होते, की हे प्रकरण मृत्यूदंडाशी संबंधित आहे. त्यामुळे याचिकेवर खुल्या कोर्टात सुनावणी घेण्यात यावी. पतियाळा हाउस कोर्टाने तिसरे डेथ वॉरंट जारी करताना फाशीसाठी 3 मार्च ही तारीख ठरवली आहे.

कोर्टाच्या कारभाराने धक्का बसला

निर्भयाच्या आई आशा देवी यांनी सुनावणी होण्यापूर्वी म्हटले होते, की "कोर्टाच्या निष्क्रीय कारभारामुळे मला धक्का बसला आहे. सारे जग बघतेय की नराधमांच्या वकिलांनी कसे कोर्टाची दिशाभूल करून फाशीची अंमलबजावणी होण्यात टाळा-टाळ केली. आता या नराधमांनी फाशीला दोन दिवस शिल्लक असताना पुन्हा याचिका मांडल्या आहेत. सुप्रीम कोर्टाला एवढा वेळ का लागतोय. निर्णय झालाच आहे, तर मग अंमलबजावणीसाठी वेळ का लागत आहे."

बातम्या आणखी आहेत...