आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खानावळीतील महिलेवर स्वयंपाक्याने केला अत्याचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


 अमरावती- शहरातील एका प्रशिक्षण केंद्राच्या खानावळीमध्ये पोळ्या करण्याचे काम करणाऱ्या तीस वर्षीय महिलेवर त्याच ठिकाणी स्वयंपाकी असलेल्या व्यक्तीने घरात येवून अत्याचार केला, अशी तक्रार पीडितेने फ्रेजरपुरा पोलिसात दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी संबधित स्वयंपाक्याविरुद्ध सोमवारी (दि. ३) उशीरा रात्री बलात्काराचा तसेच धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 


फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत असलेल्या प्रशिक्षण केंद्राच्या खानावळीमध्ये पीडित महिला ही पोळ्या तयार करण्याचे काम करत होती. त्याच ठिकाणी संदीप नावाचा व्यक्ती हा स्वंयपाकी (कूक) आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी पीडित महिला ही खानावळीमध्ये पोळ्या करत असताना संदीप जवळ आला व त्यानेे लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. या प्रकारामुळे पीडित महिला घाबरली, तिने त्यावेळी कशीबशी स्वत:ची सुटका केली आणि त्या ठिकाणाहून निघून आली. या प्रकारामुळे ती मागील चार ते पाच दिवसांपासून खानावळीमध्ये काम करण्यासाठी गेली नव्हती. त्यामुळेच सोमवारी (दि. ३) दुपारी बारा वाजताच्या दरम्यान संदीप महिलेच्या घरी गेला.

 

त्यावेळी ती घरात पूजा करत होती. संदीपने तिला विचारले की, कामावर येणे का बंद केले. तसेच घराचा दरवाजा आतमधून बंद केला, तिला जबरीने पकडून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर झालेल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली. या घटनेबाबत पीडितेने तिच्या आईला सांगितले. त्यामुळे ३ डिसेंबरला रात्री पीडितेने पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संदीप नावाच्या कुकविरुद्ध घरात प्रवेश करून बलात्कार करणे, धमकी देणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहेे. 

 

बातम्या आणखी आहेत...