आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या तेलाचा आपल्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. हाय कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगासारख्या समस्यांचे एक कारण म्हणजे योग्य खाद्य तेलाचा वापर न करणेदेखील आहे. जाणून घेऊया कोणत्या तेलामध्ये शिजवलेल्या अन्न पदार्थांचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहते आणि शरीराला पोषणही मिळते.
1. नारळाचे तेल
यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन ए, बी, सी आणि खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. रक्तदाब आणि हृदयरोग्यांसाठी नारळाचे तेल अत्यंत उपयुक्त आहे. कारण यात पोटॅशियमचे अधिक प्रमाण असते. त्यामुळे हृदयाचे कार्य योग्य पद्धतीने चालते आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठीही पोटॅशियम उपयुक्त आहे. याशिवाय हे तेल कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यामध्येही मदत करते. त्यामुळे हृदयरोग होण्याचा धोकाही कमी राहतो.
2. ऑलिव्ह ऑइल
यात असलेले फॅटी अॅसिडचे पुरेसे प्रमाण हृदयरोगाचे धोके कमी करते. सोबतच या तेलामध्ये अतिरिक्त चरबीचे प्रमाण कमी असते. यामुळे शरीरात कोलेस्टेरॉलचे संतुलन कायम राहते. सोबतच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकादेखील कमी होतो. यामध्ये अँटिऑक्सिडंटही मोठ्या प्रमाणात असल्याने याला आरोग्यवर्धक खाद्य तेल म्हटले जाते.
3. तिळाचे तेल
काळ्या आणि पांढऱ्या तिळांपासून हे तेल काढले जाते. हे तेल मॅग्नेशियम, कॅल्शियम, प्रोटीन आणि फाॅस्फरसचा खूप चांगला स्रोत आहे. तिळाचे तेल आरोग्यासाठी खूप गुणकारी असते. याच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यामध्ये मदत होते. सोबतच कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित राखण्यासाठीही याची मदत होते. त्यामुळे हृदयविकार असलेल्यांनी तिळाच्या तेलाचा वापर करावा, असा सल्ला नेहमीच दिला जातो.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, या दोन तेलांविषयी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.