आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: कुलीने मिळवले स्पर्धा परीक्षेत यश, रेल्वे स्टेशनवरील WiFi च्या मदतीने केला अभ्यास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क- तुमच्या मनात काही मोठं करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. स्टेशनवर काम करणाऱ्या एका कुलीची गोष्टही अशीच आहे. मोठ्या-मोठ्या कोचिंग सेंटर आणि दिवसभर अभ्यास करूनही जे प्राप्त नाही करू शकत ते श्रीनाथने केले आहे. त्याने रेल्वे स्टेशलवरील  फ्री वाय फायच्या मदतीने अभ्यास करून सिव्हील सर्विसची परिक्षा पास झाला आहे.


-  केरळच्या मुन्नारमध्ये राहणारा श्रीनाथ मागील पाच वर्षापासून एर्णाकुलम स्टेशनवर कुलीचे काम करत आहे. मुन्नारजवळील या सगळ्यात मोठ्या रेल्वे स्टेशनवर लोकांचे सामान उचलून पोट भरणाऱ्या श्रीनाथला स्वत: ला या दलदलितून बाहेर काढायचे होते. पण गरिबीमुळे मोठ्या कोचिंग सेंटरला देण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. पण त्याने हार न मानता रेल्वे स्टेशनच्या वाय फाय वरून अभ्यास केला आणि सिव्हील सर्विसची परिक्षा पास झाला. आता त्याला सरकारी नोकरी मिळू शकते आणि तो त्याला हवे होते असे चांगले जीवन जगू शकतो. 


-दहावी पास श्रीनाथ कुली कुलीचे काम करता करता मोबाइलवर अभ्यास करायचा. स्टडी मटेरिअल आणि शिक्षकांचे लेक्चर ईअरफोनमधून ऐकायचा. काम करत करत तो सगळा अभ्यास करायचा. आहे त्या परिस्थीत अभ्यास करून यश मिळवणाऱ्या श्रीनाथने देशासमोर एक आदर्श ठेवला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...