• Home
  • Gossip
  • 'Coolie no. 1' First look came out, Varun shared and wrote, 'Hat jao baju, Aaya Raju'

फर्स्ट लुक / 'कुली नं. 1' चा फर्स्ट लुक आला समोर, वरुणने शेअर करून लिहिले, 'हट जाओ बाजू, आया राजू'

1995 च्या सुपरहिट चित्रपटाचा आहे रीमेक

दिव्य मराठी वेब

Aug 12,2019 01:07:06 PM IST

बॉलीवुड डेस्क : वरुण धवन आणि सारा अली खान स्टारर 'कुली नंबर 1' चे फर्स्ट लुक सोमवारी रिलीज झाले. वरुणने चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर करून लिहिले, "कुली नं. 1, 1 मे 2020. हट जाओ बाजू, आया राजू." पोस्टरमध्ये तो कुलीच्या पोशाखात आणि कोल्हापुरी चप्पल घातलेला दिसत आहे आणि यासोबतच सांगितले गेले आहे की, हा डायरेक्टर डेविड धवन यांचा 45 वा चित्रपट आहे. चित्रपटाचे प्रोडक्शन वासु भगनानी करत आहेत.

बॅकग्राउंडमध्ये ऐकू येत आहे साराचा आवाज...
मोशन पोस्टरच्या बॅकग्राउंडमध्ये सारा अली खान जोरजोरात कुली ला आवाज देताना ऐकू येत आहे. प्रसिद्ध गाणे 'तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं' चे म्यूझिक वाजत आहे. चित्रपटाचे दोन स्टिल पोस्टरदेखील समोर आले आहेत. यातील एकामध्ये सारा आणि वरुण रोमँटिक स्टाईलमध्ये दिसत आहेत तर दुसऱ्यामध्ये केवळ वरुण दिसत आहे.

अभिनेत्याने एका पोस्टरसोबत लिहिले आहे, "सारा तुझा बर्थडे आला, बर्थडेच्या दिवशी मी तुझ्यासाठी पोस्टर आणले." त्याने राजूच्या साराला हॅशटॅगदेखील केले.

1995 च्या सुपरहिट चित्रपटाचा आहे रीमेक...
ओरिजनल 'कुली नं. 1' मध्ये गोविंदा आणि करिश्मा कपूरने लीड रोल साकारला होता. हा 1995 मध्ये रिलीज झाला होता आणि डेविड धवन यांनीच दिग्दर्शित केला होता. डेविड यांनी यापूर्वी वरुण धवनला घेऊन सलमान खान, करिश्मा कपूर आणि रंभा स्टारर 'जुडवा' (1997) चाही रीमेक बनवला आहे. जो 2017 मध्ये रिलीज झाला होता.

X
COMMENT