आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कुली नं. 1' च्या सेटवर होत आहे प्लास्टिक फ्री बाटल्यांचा वापर, पीएम कौतुक करत म्हणाले - 'उत्तम पाऊल उचललेत'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्लास्टिक फ्री बाटल्यांचा वापर करण्यासाठी 'कुली नं. 1' च्या टीमचे कौतुक केले आहे. गुरुवारी त्यांनी चित्रपटातील मुख्य अभिनेता वरुण धवनच्या 12 दिवस जुन्या पोस्टवर रिप्लाय करून लिहिले, "कुली नं. 1 च्या टीमने उत्तम पाऊल उचलले आहे. देशाला सिंगल यूज प्लास्टिकपासून मुक्त करण्यासाठी चित्रपट जगताचे योगदान पाहून खूप खुश आहे."
 

   

ही होती वरुण धवनची पोस्ट... 
वरुण धवनने 1 सप्टेंबरला ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये चित्रपटाची संपूर्ण टीम हातात स्टीलच्या बॉटल्स घेऊन उभी दिसत आहे. वरुणने लिहिले होते, "प्लास्टिक मुक्त राष्ट्र आणि त्यासाठी आपल्या पंप्रधानांचे प्रयत्न वेळेची मागणी आहे. आपण छोटे-छोटे बदल करून असे करू शकतो. 'कुली नं. 1' च्या सेटवर आता केवळ स्टीलच्या बॉटल्सचाच वापर केला जाईल."
 
 
 

पीएम यांच्या ट्वीटवर प्रोड्यूसरचा रिप्लाय... 
पीएम मोदी यांच्या ट्वीटवर चित्रपटाचे प्रोड्यूसर जॅकी भगनानीने रिप्लाय केला आहे. त्याने लिहिले, "धन्यवाद पीएम नरेंद्र मोदी सर. आम्ही पर्यावरण वाचवण्यासाठी तुम्ही केलेल्या सुरुवातीचा एक छोटासा भाग बनून खूप खुश आहोत." वरुण धवननेदेखील पंतप्रधानांचे आभार मानले. 
 
 
 

   

डेविड धवनच्या दिग्दर्शनात बनत असलेला 'कुली नं. 1' मध्ये वरुण धवनसोबत सारा अली खान, परेश रावल, जॉनी लिव्हर आणि राजपाल यादव महत्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट 1 मे 2020 ला रिलीज होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...