आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागॅजेट डेस्क - चीनी कंपनी कूलपॅडने कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES2020)मध्ये लिगेसी 5G स्मार्टफोन लॉन्च केला. हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. सुरुवातीला याची विक्री पाश्चिमात्य बाजारात केली जाईल. याची किंमत 400 डॉलर (अंदाजे 29 हजार रुपये) च्या आत असेल. फोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटीसोबत 48-मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे.
कूलपॅड लिगेसी 5G चे स्पेसिफिकेशन
> या फोनमध्ये सिंगल सिम सपोर्ट मिळेल. तसेच अँड्राईड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर रन करेल. सोबतच यामध्ये कंपनीचा वनीला ओएस सुद्धा मिळेल. फोनमध्ये 6.53-इंच फुल HD+ IPS LCD वाटरड्रॉप नॉच डिस्प्ले स्क्रीन देण्यात आली आहे.
> फोनमध्ये क्वालकॉम ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 765 प्रोसेसर देण्यात आले आहे. तर स्नॅपड्रॅगन X52 5G मॉडेम मिळेल. यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आले आहे. मायक्रो SDच्या मदतीने स्टोरेज 128GB पर्यंत वाढवता येते.
> फोनमध्ये डुअल रिअर कॅमेरा दिला आहे. यात 48 मेगापिक्सल लेंस आणि 8 मेगापिक्सल वाइड-अँगल लेंस दिली आहे. सेल्फीसाठी यात 16 मेगापिक्सलचा फिक्स्ड फोकस लेंस दिली आहे.
> फोनमध्ये 4000mAh बॅटरी दिली असून ती 18 वॉटच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये क्वालकॉम क्विक चार्च 3.0 तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.