आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर:दगडफेक करणारे बनून खऱ्या गुन्हेगारांना पकडताहेत पोलिस, दोन समाजकंटकांना पकडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - काश्मिरमधील दगडफेकीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलिसांनी नवीन रणनिती तयार केली आहे. त्यानुसार पोलिस दगडफेक बनणारे बनून त्यांच्यात मिसळतात आणि खऱ्या गुन्हेगारांना अटक करतात. शुक्रवारी पोलिसांनी याच नितीच्या मदतीने जामा मशिदीजवळ अशा दोन समाजकंटकांना अटक केली. हे दोघे दगड फेकणाऱ्यांचे नेतृत्व करत होते. 


पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी नमाजनंतर जमलेल्या गर्दीने पोलिस आणि सीआरपीएफ जवानांवर दगडफेक सुरू केली. पोलिसांनी सुरुवातीला दगडफेकीला काहीही प्रत्युत्तर दिले नाही. त्यांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या नाहीत किंवा लाठीचार्जही केला नाही. 


जमावाचे नेतृत्व करणाऱ्यांना पकडले 
दगडफेक केल्यानंतर काही वेळाने 100 पेक्षा जास्त लोक जमा झाले आणि दोन जण दगडफेक करणाऱ्यांचे नेतृत्व करू लागले. पोलिसांनी अचानक गर्दीला पांगवण्यासाठी अश्रुधुराची नळकांडी सोडली. त्यानंतर गर्दीत असलेल्या जवानांच्या मदतीन नेतृत्व करणाऱ्या दोघांना पकडले. तर गर्दीत असलेले इतर पोलिस कर्मचारी टॉय गनने इतरांना घाबरवत होते. पोलिसांच्या या रणनितीमुळे घाबरून गर्दीने आंदोलन थांबवले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी 2010 मध्ये सर्वात आधी या रणनितीवर काम केले होते. त्यावेळी अनेकांना दगडफेक करणाऱ्यांना पकडण्याची जबाबदारी देण्यात आली होती. 

बातम्या आणखी आहेत...