Home | Maharashtra | Mumbai | Cops in Maoist affected areas to get increased salary

खुशखबर...नक्षली भागात तैनात पोलिस कर्मचा-यांना मिळणार दीडपट महागाई भत्‍ता आणि वेतन

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Sep 14, 2018, 04:30 PM IST

नक्षलग्रस्‍त भागात तैनात पोलिस कर्मचा-यांच्‍या मूळ वेतनात आणि महागाई भत्‍त्‍यात दीडपट वाढ.

  • Cops in Maoist affected areas to get increased salary

    मुंबई - नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्‍ह्यातील अहेरी आणि गोंदिया जिल्‍ह्यात अतिसंवदेनशील परिसरात तैनात असलेल्‍या पोलिस कर्मचा-यांच्‍या मूळ वेतनात आणि महागाई भत्‍त्‍यात दीडपट वाढ करण्‍याचा निर्णय राज्‍य शासनाने घेतला आहे. गृहविभागाने यासंबंधीचा जीआर जारी केला आहे. यानूसार 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2020 पर्यंत पोलिस कर्मचा-यांना याचा लाभ मिळणार आहे.


    यामुळे घेतला निर्णय
    नक्षलग्रस्‍त परिसरात काम करणे अतिशय धोक्‍याचे असते, यामुळे येथे तैनात असलेल्‍या पोलिस कर्मचा-यांच्‍या वेतनात वाढ करण्‍यात आली आहे, असे राज्‍य शासनातर्फे सांगण्‍यात आले आहे. गडचिरोली आणि गोंदियातील नक्षलग्रस्‍त परिसरात तैनात राज्‍य आरक्षित पोलिस दल, भ्रष्‍टाचार विरोधी पथक, परिवहन विभाग तसेच राज्‍य गुप्‍तचर विभागासह अन्‍य विभागातील पोलिस अधिकारी आणि कर्मचा-यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

Trending