आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर बसलेल्या वृद्धाला वाचवण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी लावली जीवाची बाजी, व्हिडिओ झाला व्हायरल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शहराची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनसमोर जावी देण्यासाठी गेलेल्या वृद्ध व्यक्तीला महाराष्ट्र सुरक्षा दला (MSF)च्या दोन कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून वाचवले. मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर झालेल्या घटनेचा व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर लावलेल्या कॅमेरात कैद झाला.


त्या व्यक्तीचा जीव वाचवणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे एसएच मनोज आणि अशोक अशी आहेत. हे दोघे रेल्वे पोलिस दलाच्या टीममध्ये होते. व्हिडिओत दिसते की, पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला व्यक्ती प्लॅटफॉर्मवरून खाली उतरतो आणि पटरीवर जाऊन बसतो. समोरून ट्रेनला येताना पाहून कर्मचारी खाली उतरतो आणि त्या व्यक्तीला बाजुला करतो.

 

चौकशीअंती वृद्धाच्या घरी वाद सुरू असल्याने त्याने आत्महत्या करण्याचा विचार केल्याचे समोर आले. त्याचा जीव वाचवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीआरपी सत्कार करणार आहे.