आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभरात यात्रा, धार्मिक, सामुदायिक, शासकीय कार्यक्रम रद्दचे निर्देश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रुग्णसंख्या १४ वर, मात्र, तीव्र लक्षणे नाहीत; गुरुवारी आढळले ३ नवीन रुग्ण
  • व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने मंत्रालयातून आढावा

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील यात्रा, सामुदायिक-धार्मिक कार्यक्रम, मोहिमा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करा तसेच प्रत्येक शहरातील पर्यटन कंपन्यांना पुढील काही दिवस बुकिंग न करण्याच्या सूचना जारी करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुुरुवारी प्रत्येक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, राज्यात कोरोना बाधितांची संख्या १४ वर गेली आहे. काही रुग्णांत लक्षणे कमी स्वरूपाची आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. गुरुवारी आढळले ३ नवीन रुग्ण

राज्यात गुरुवारी ३ रुग्ण आढळले. पुण्याच्या ३३ वर्षीय पुरुषाने अमेरिकेचा प्रवास केला होता. फ्रान्सच्या प्रवासाचा इतिहास असलेला ठाणे येथील ३५ वर्षीय तरुण तसेच हिंदुजा येथे भरती आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेला ६४ वर्षांचा पुरुष गुरुवारी बाधित आढळले. राज्यात ५० नवीन संशयित रुग्णांची भरती 
 
राज्यातील कोरोनाग्रस्तांची रुग्णांची संख्या १४ वर गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली. राज्यात एकूण ५० नवीन संशयितांना रुग्णालयांत दाखल केले आहे. १२ मार्चपर्यंत विमानतळावर १,२९५ विमानांमधील १ लाख ४८ हजार ७०६ प्रवासी तपासले आहेत. भरती केलेल्यांपैकी सर्व ३१७ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.