आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Effect | IPL Matches To Be Without The Audience ; No Entry In India Africa Series

आयपीएल सामने विनाप्रेक्षक होणार; भारत-आफ्रिका मालिकेतही नाे एंट्री!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे मंत्रालयाची सर्व खेळांच्या संघटना व बीसीसीआयला गर्दी टाळण्याची सूचना
  • देशात ८ स्पर्धांचे आयाेजन अडचणीत

नवी दिल्ली - आयपीएलच्या १३ व्या सत्रातील सामने चाहत्या विना होऊ शकतात. कोरोना व्हायरसचा धोका पाहता क्रीडा मंत्रालयाने सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटना व बीसीसीआयला सूचना दिल्या. त्यानुसार काेणत्याही स्पर्धेदरम्यान गर्दी करण्यास मनाई केली. आयपीएलचे सामने २९ मार्च पासून सुरू होत आहेत. यात ६४ विदेशी खेळाडूंना संधी मिळाली. आयपीएल गव्हर्निंग काैन्सिलची १४ मार्च रोजी बैठक होणार आहे. यात लीग बाबत निर्णय घेतला जाईल. १५ एप्रिलपर्यंत सरकारकडून सर्व व्हिसा रद्द करण्यात आले आहे.  स्पर्धेदरम्यान खेळाडूंना खेळवण्यासाठी सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल.  भारत व द. आफ्रिका यांतील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांत देखील प्रेक्षक असणार नाहीत.

आयपीएलच्या ८ संघांत १८९ खेळाडू 


आयपीएलच्या ८ संघांत १८९ खेळाडूंचा समावेश आहे. यात ६४ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने म्हटले की, आयपीएल कार्यक्रमानुसार होईल. गरज पडल्यास आरोग्य विषयक सूचना जाहीर केल्या जातील. दुसरीकडे, महाराष्ट्र सरकारने आयपीएलच्या तिकीट विक्रीवर बंदी घातली आहे. क्रीडा मंत्री राधे श्याम जुलानियाने म्हटले की, खेळाच्या स्पर्धा सुरू राहतील, मात्र, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार नाहीत. आम्ही बीसीसीआयसह सर्व क्रीडा संघटनांच्या फेडरेशनला आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांचे पालन करण्यास सांगितले. 

देशात ८ स्पर्धांचे आयाेजन अडचणीत 


> अॅथलेटिक्स :६ ते ८ एप्रिलदरम्यान भोपाळमध्ये होणारी ज्युनिअर फेडरेशन कप स्पर्धा रद्द.
> बॅडमिंटन : इंडिया ओपन २४ ते २९ मार्चदरम्यान दिल्लीत. प्रेक्षकांवर बंदी.
> बास्केटबॉल : १८ ते २२ मार्चदरम्यान बंगळुरूत होणारा ३ ऑन ३ ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा रद्द.
> क्रिकेट :१५ एप्रिल पर्यंत आयपीएलमध्ये विदेशी खेळाडू खेळणार नाहीत. 
> फुटबॉल : १४ मार्चला गोवा येथे होणाऱ्या आयएसएल फायनलमध्ये प्रेक्षक नसतील. २६ मार्च व ९ जून रोजी होणारे विश्वचषक पात्रता सामने टाळले. १४ ते २७ एप्रिलदरम्यान संतोष ट्रॉफीची पाचवी फेरीत पुढे ढकलली.
> गोल्फ : १९ ते २२ मार्चदरम्यान इंडिया ओपन रद्द.
> पॅरा स्पर्धा : सर्व राष्ट्रीय, राज्यस्तरीय स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत रद्द.
>  नेमबाजी : १५ ते २५ मार्च दरम्यान दिल्लीत होणारी विश्वचषक स्पर्धा टाळली. 

फ्रँचायजीची विदेशी खेळाडूंच्या परवानगीची मागणी


फ्रँचायजीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, सामन्यादरम्यान चाहते नसतील, तरी काही अडचण नाही. मात्र, बीसीसीआयने विदेशी खेळाडूंसाठी सरकारशी चर्चा केली पाहिजे. व्हिसा नियमांमुळे १५ एप्रिलपर्यंत कोणताही विदेशी खेळाडू येऊ शकणार नाही. विदेशी खेळाडू न अाल्यास स्पर्धेवर परिणाम होईल.

एनबीएचे पूर्ण सत्रच रद्द 


जगातील सर्वात मोठी बास्केटबॉल लीग एनबीएला टाळण्यात आले. एक खेळाडू कोरोना बाधित आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी अमेरिकेत इंडियन वेल्स टेनिस स्पर्धादेखील रद्द करण्यात आली.  मेलबर्नच्या व्यवस्थापकाने म्हटले की, ८ मार्चच्या भारत व ऑस्ट्रेलिया महिला टी-२० विश्वचषकादरम्यान प्रेक्षक संशयित आढळला नाही.
ला लीगा पुढे ढकलले
स्पॅनिश फुटबॉल लीग ला लीगला दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. रियल माद्रिद क्लबला थांबवण्यात आले. तेथे एक बास्केबॉलपटू बाधित आढळल्यानंतर हा निर्णय घेतला. यादरम्यान इटालियन सीरी ए लीगच्या एका खेळाडूला संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.  युवेंट्सचा डिफेंडर डेनियेल रुगानीचा समावेश आहे. 

बातम्या आणखी आहेत...