आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत फक्त 8 दिवसांत उभी केली बनावट सॅनिटाइझरची फॅक्टरी, लाखोंचे सामान जप्त; अन्न व औषध विभागाची कारवाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईत संस्कार आयुर्वेद नावाच्या कंपनीवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात बनावट सॅनिटाइझर्स केले जप्त
  • फक्त पाणी आणि केमिकल मिसळून बनावट सॅनिटायझर बनविण्यात येत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले

मुंबई - एकीकडे देशात कोरोना संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या भीतीचा लाभ घेणाऱ्यांची कमतरता नाही. गुरुवारी मुंबईच्या वाकोलामध्ये पोलिसांनी बनावट सॅनिटाइझर बनवणाऱ्या फॅक्टरीचा भंडाफोड केला. संस्कार आयुर्वेद नावाची सॅनिटाइझर तयार करणारी फॅक्टरी 8 दिवसांपासून सुरू केल्याचे तपासात उघडकीस आले. याप्रकरणी 4 लोकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. उत्पादनावर कोणताही परवाना किंवा बॅच क्रमांक नाही; एफडीएच्या छापेमारीने खुलासा


मुंबईच्या अन्न व औषध विभागाने (एफडीए) वाकोला येथील संस्कार आयुर्वेद या फॅक्टरीत छापेमारी करत मोठ्या प्रमाणात बनावट सॅनिटाइझर जप्त केले आहे. एफडीएचे निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले की, "सदरील कंपनी विनापरवागनी सॅनिटाइझर तयार करत होती. या कंपनीची स्थापना 8 दिवसांपूर्वी बनावट मार्गाने केली गेली होती. कंपनीच्या फॅक्टरीत मिळालेल्या सॅनिटाइझर बॉटल्सवर लायसेन्स नंबर किंवा बॅच नंबर नव्हते." दरम्यान, ही कंपनी 'मेड इन वकोला' या नावाने बनावट सॅनिटायझर्सची विक्री करीत असल्याचे एफडीएच्या तपासणीत असे दिसून आले आहे.

फक्त पाणी आणि केमिकलद्वारे तयार करत होते सॅनिटाइझर


हे बनावट सॅनिटाइझर बाजारात 105 ते 190 रुपयांपर्यंत विकले जात होते. यामध्ये पाणी आणि निकृष्ट दर्जाचा कच्चा माल वापरण्यात येत होता. चिंतेची बाब म्हणजे, कोणत्याही तपासणीशिवाय वैद्यकीय स्टोअर्समध्ये बिनधास्तपणे ग्राहकांना हे बनावट सेनेटिझर्स विकले जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...