आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाथषष्ठी यात्रा रद्द तरी दर्शनासाठी वारकऱ्यांची हजेरी, आज नाथवंशजांच्या मानाच्या दिंडीची मिरवणूक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वारकरी दिंडीतून आलेले दर्शन घेऊन गाड्यांनी परतू लागले
  • पैठणला सर्व शाळांना आज सुटी

रमेश शेळके 

पैठण - ‘आलो नाथा तुझ्या घरी,  भानुदास एकनाथ नाममुखी, ठेव आनंदी सदा’, म्हणत शुक्रवारी  पैठण नगरीत  उशिरा पर्यंत शेकडो दिंड्या व हजारो वारकरी नाथनगरीत दाखल झाले.  मात्र दिंड्यांमध्ये वारकऱ्यांची संख्या कमालीची घटल्याचे चित्र अाहे. शुक्रवारपासूनच नाथ समाधी वाड्यातील नाथ महाराज यांच्या दर्शनासाठीसाठी हजारो भाविक-वारकरी, नाथनगरीत नाथ उत्सवाच्या एक दिवस अगोदर दाखल होताना दिसले. कोरोनामुळे यात्रा रद्द झाली असतानाही मोठ्या संख्येने वारकरी नाथ नगरीत दाखल झाले हे विशेष.


 
‘हरी जागरणी दिवस आनंदे सौरसे गावया उल्हास वैष्णवासी, गाता पै नाचता तया जाला पै..’, या अभंगा प्रमाणे पैठण नगरीच्या परिसरात शनिवारी सुमारे पन्नास हजारांच्या वर  वारकरी दाखल झाले. राज्यातील कानाकोपऱ्यातून सलग चारशेहून अधिक वर्षांपासून पैठणच्या यात्रेत पायी दिंडीतून नाथ महाराजांच्या दर्शनासाठी वारकरी शेकडो मैल प्रवास करत येतात. यंदा जगभरात कोराेनाचा उद्रेक झाला असल्याने व यात्रा रद्द करूनही वारकरी मात्र मोठ्या संख्येने पैठणमध्ये  दाखल होत आहेत. विशेष म्हणजे शहरात फडाला व वारकऱ्यांना थांबू दिले जात नसले तरी जवळच्या गावात वारकरी मुक्कामी थांबत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज काय : दिंड्यांची मिरवणूक

संत एकनाथ महाराज यांच्या राहत्या वाड्यापासून  शनिवारी दुपारी नाथवंशजांची पहाली मानाची दिंडी मिरवणूक निघेल. या मिरवणुकीत राज्यातील विविध भागातून आलेल्या काही मानाच्या दिंड्याचाही सहभाग असणार आहे. पैठणला सर्व शाळांना आज सुटी

पैठण शहरात आज संत एकनाथ महाराज यांचा नाथषष्ठी महोत्सवानिमित्ताने मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेता कोराना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार शेळके यांनी दिली. पवित्र रांजण भरला

नाथवाड्यात  साक्षात भगवंताने नाथाघरी कावडीने पाणी भरले अशी आख्ययिका असलेला पवित्र रांजण   शुक्रवारी सकाळी नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील महिला प्रिया विनायक चोपडे यांच्या कावडीने भरला. हा पवित्र रांजण भरल्यानंतर नाथषष्ठी उत्सवाला प्रारंभ होतो.
 

बातम्या आणखी आहेत...