आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यावसायिकांचे कंबरडे माेडले, मालाचे करावे कायॽ दुकान मालक अडचणीत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यात्रा मैदानावर रहाटपाळणे उभारणीचे काम सुरू असतानाच यात्रा रद्द झाल्याने ते काढावे लागले.  छाया : ऋषिकेश भगत - Divya Marathi
यात्रा मैदानावर रहाटपाळणे उभारणीचे काम सुरू असतानाच यात्रा रद्द झाल्याने ते काढावे लागले. छाया : ऋषिकेश भगत
  • रहाटपाळण्यांची राेजची उलाढाल लाखाच्या घरात
  • यात्रा रद्द, दुकाने बंद, अडचणींत वाढ

पैठण - पैठणच्या नाथषष्ठी यात्रेला  शनिवारपासून सुरुवात होत अाहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आली असल्याने यात्रेच्या दरम्यान तीन दिवसांत व त्यानंतर पाडव्यापर्यंत राहणारा यात्रेतील व्यवसाय हा शंभर कोटीच्या घरात जातो. यात जवळपास पन्नास लाखांचा तर केवळ रहाटपाळण्याचा व्यवसाय होतो. मात्र या  रहाटपाळण्यांना मागील काही वर्षांपासून राजकीय ग्रहण लागले असतानाच आता कोरोनाच्या व्हायरसचे नवीन ग्रहण लागले आहे. यात्रेतील प्रमुख आकर्षण व व्यापाराला चालणा देणारे रहाटपाळणे अर्ध्यावर उभे करण्यात आले आहेत. रहाटपाळण्यांवर कोरोनाची  पहिली कुऱ्हाड पडली आहे. यात्रेतील रहाटपाळणे व  इतर लहान व्यवसायिकांची  वर्षभरात जी आर्थिक उलाढाल होते तेवढी या तीन दिवसांतच यात्रेत होते. आता ती सुमारे ९० टक्क्यांनी  कमी होणार आहे.
 

रहाटपाळण्यांची राेजची उलाढाल लाखाच्या घरात
 
कोरोना व्हायरसच्या धास्तीमुळे नाथषष्ठी यात्रा रद्द झाली. त्यामुळे राहटपाळण्याला परवानगी रद्द करण्यात आली. राहटपाळण्याच्या माध्यमातून नगर परिषदेला १० लाख २५ हजार रुपयांचा महसूल मिळाला हाेता. त्यापैकी राहटपाळणा चालक यांनी ५ लाख ५० हजार रुपये पालिकेत जमा केले. ते अाता यात्रा रद्द झाल्याने पालिकेने ते परत केले असले तरी रहाटपाळण्याचे साहित्य गुजरात, नाशिक, धुळे, मालेगाव या ठिकाणाहून आण्यात आले होते. या साहित्याच्या वाहतुकीसाठी साडेचार लाखाचा खर्च आला असल्याचे चालकांनी सांगितले.
 

अनेक खेळण्यांचे साहित्य पडून

५० फूट उंच रहाटपाळणा असून त्याला २६ डोल्या आहेत. या मोठ्या रहाटपाळण्यासह इतर साहित्यात मौत का कुव्वा, छोट्या बोटीसह इतर खेळण्यांचे साहित्यही आले आहे. या माध्यमातून पालिकेला यात्रे दरम्यान सर्वात जास्त महसूल मिळतो. इतर लिलावांच्या तुलनेत राहटपाळण्यातून सर्वाधिक महसूल मिळतो.रहाटपाळण्यांचे पैसे परत केले

राहटपाळणे यात्रेतील प्रमुख आकर्षण असते. यंदा यासाठी दहा लाख रुपये पालिकेला महसूल मिळाला होता. मात्र कोरोनामुळे यात्रा रद्द झाल्याने रहाटपाळण्याचे पैसे परत करण्यात आले आहेत. पाळणे यात्रा मैदानातून काढण्यासाठी पत्र दिले आहे. 

सोमनाथ जाधव, मुख्यधिकारी न. प., पैठणयात्रा रद्द, दुकाने बंद, अडचणींत वाढ
 
१६ तासांत यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आम्ही यात्रा डोळ्यासमोर ठेवून  माल खरेदी करून ठेवला. या तीन दिवसांत वर्षभराचा व्यवसाय होतो. आता खरेदी केलेला माल कधी विकणार. त्यावरच देणे अवलंबून असते.-उमेश पंडुरे, हाॅटेल चालक.बातम्या आणखी आहेत...