आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द, ट्विटरवरुन दिली माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्य सरकारने अनेक गर्दी जमा होईल अशी ठिकाणे बंद केली आहेत

मुंबई- देशात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसच्या भीतीने राज्य सरकारने अनेक सरकारी कार्यक्रम रद्द केले. तसेच, काही काळासाठी मुंबई आणि पुण्यातील अनेक सार्वजनिक ठिकाणे बंद करण्याचे आदेश दिले. यातय आचा खबरदारी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गुढीपाडवा मेळावा रद्द करण्यात आला आहे. मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली.

मनसेने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून गुढीपाडवा मेळावा रद्द करत असल्याचे सांगितले. त्यांनी लिहीले, ‘कोरोना’चं सावट गडद आहे त्यामुळे ह्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द करत आहोत. तसंच येत्या काही आठवड्यात महापालिकांच्या निवडणूका होणार आहेत पण एकूण परिस्थिती पाहता सरकारने ह्या निवडणुका किमान सहा महिन्यांसाठी पुढे ढकलाव्यात.

आजपासून 5 शहरांत चित्रपटगृहे, व्यायामशाळा, स्विमिंग पूलही बंद; मुख्यमंत्र्यांची घोषणा


जगभरात कोरोना व्हायरसने (कोव्हिड - 19) थैमान घातले असून राज्यातही कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 18 वर गेला आहे. कोरोना आणखी पसरू नये यासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी - चिंचवड येथील चित्रपगृहे, व्यायामशाळा, स्विमिंग पूल पुढील सूचना देईपर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. यानंतर पत्रकार परिषदेतही त्यांनी याबाबत माहिती दिली. चीन, दक्षिण कोरिया, इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इराण व दुबईहून शुक्रवारी राज्यात आलेल्या प्रवाशांचीही तपासणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.बातम्या आणखी आहेत...