आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Impact On Airlines | There Will Be A Direct Impact On The Pocket Of The Passengers, Hike Possible

विमान प्रवाशांच्या खिशावर थेट परिणाम होणार, भाडेवाढ शक्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बंदीमुळे पर्यटन आणि विमान क्षेत्रास ८,५०० कोटी रुपयांच्या नुकसानीची शक्यता
  • खासगी विमानतळ संचालकांची तिकिटावर शुल्क लावण्याची मागणी

नवी  दिल्ली - कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. भारतही यापासून दूर नाही. कोरोना विषाणूचा धोका पाहता केंद्र सरकारने विदेशींना भारतात येण्यावर बंदी घातली आहे. विषाणूच्या भीतीमुळे प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. यामुळे हवाई वाहतूक आणि पयर्टन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. दुसरीकडे, खासगी विमानतळ संचालकांना विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करावी लागत आहे. यामध्ये होणाऱ्या खर्चाची भरपाई करण्यासाठी विमानतळ संचालकांनी िवमान तिकिटावर “प्रवासी सुविधा शुल्क’ लावण्याची मागणी केली आहे. खासगी विमानतळ संचालकांची संघटना असोसिएशन ऑफ प्रायव्हेट ऑपरेटर्स(एपीएओ)ने सरकारला एक पत्र लिहिले आहे. यामध्ये नमूद केले की, विविध एअरलाइन्सने उड्डाणे रद्द केली आहेत. आगामी काळातही उड्डाणे रद्द करावी लागू शकतात.
 

तिकीट रद्द करण्याचे शुल्क माफ करावे, आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सला निर्देशुल्क माफ करण्याचे आवाहन केले आहे. यासोबत अन्य कोणतेही प्रोत्साहन देण्यावर विचार करण्यास सांगितले आहे. नियामकाने या संदर्भात गुरुवारी परिपत्रक जारी केले
 

दिल्लीच्या विमानतळावर प्रवाशांची संख्या घटली


जगभर हाहाकार उडवणाऱ्या कोरोना विषाणूच्या भीतीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळा(आयजीआय)वरील प्रवाशांच्या संख्येत ३६% घट आली आहे. सामान्य दिवसांत जिथे रोज २५ हजारांहून अधिक प्रवासी येत होते. आता ही संख्या घटून १६ हजार झाली आहे.  अमेरिकेने ब्रिटन वगळता युरोपातील प्रवाशांसाठी ३० दिवसांची बंदी घातली आहे.
 बंदीमुळे पर्यटन आणि विमान क्षेत्रास ८,५०० कोटी रुपयांच्या नुकसानीची शक्यता
 


कोरोना विषाणू महामारीमुळे विदेशातील प्रवाशांना भारतात बंदी घालण्याच्या निर्णयामुळे पर्यटन आणि विमान क्षेत्राला ८,५०० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. केंद्र सरकारने १५ एप्रिलपर्यंत सर्व देशांचा पर्यटक व्हिसा निलंबित केला आहे. सरकारने सर्व प्रकारचा सामान्य व्हिसा एका महिन्यासाठी स्थगित केला आहे.
 

व्हिसा बंदीच्या निर्णयाचा सरकारने आढावा घ्यावा 
 
आयएटीओ-अॅसोचेम ट्रॅव्हल कंपन्यांची संघटना “इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स’(आयएटीओ) आणि असोचेमनुसार, पर्यटन व एअरलाइन्सचा अनावश्यक मनुष्यबळाच्या कपातीचा नाइलाज झाला. व्हिसा बंदीच्या निर्णयाचा सरकारने आढावा घ्यावा. काही शहरांत तपासणीनंतर परवानगीची विनंती केली आहे.
 

एअर इंडियाने सात देशांची उड्डाणे एप्रिलपर्यंत रोखली
 
एअर इंडियाने इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इस्रायल, दक्षिण कोरिया आणि श्रीलंकेसाठीच्या उड्डाणांवर ३० एप्रिलपर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी एअरलाइने गुरुवारी कुवेतची उड्डाणेही ३० एप्रिलपर्यंत रोखली होती. याआध एअरलाइनने गुरुवारी कुवेतची उड्डाणेही रोखली आहेत.

बातम्या आणखी आहेत...