आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात फार्मासिस्टने 35 हजारांचे मास्क आणि औषधींची केली चोरी, पोलिसांनी केली अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्मक फोटो - Divya Marathi
प्रतीकात्मक फोटो
  • मास्कची वाढती मागणी लक्षात घेता त्यांची साठवणूक न करण्याचे राज्य सरकारने आवाहन केले आहे

पुणे - कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या भीतीने पुण्यातील एका रुग्णालयातील फार्मासिस्टला मास्क आणि औषधी चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कोरेगाव पार्क पोलिसांनी सांगितले की, 28 वर्षीय आरोपीने शनिवारी हॉस्पिटलमधून मास्क, इंजेक्शन आणि औषधींची चोरी केली होती. यांची अंदाजे किंमत 35 हजार रुपये आहे. हॉस्पिटल प्रशासनाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

मास्कची साठवणूक करू नका, राज्य सरकारचे आवाहन 

दरम्यान महाराष्ट्रात अद्याप कोरोना विषाणू संसर्गाचे एकही प्रकरण समोर आले नाही. परंतु देशात वाढत्या संसर्गाची घटना लक्षात घेता लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अन्न व औषध विभागानेही मास्कची वाढती मागणी लक्षात घेता दुकानदारांनी साठवणूक न करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान राज्यात कोरोना संसर्गाच्या शंकेमुळे 258 लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते, त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी इतर 15 लोकांना मुंबई आणि पुणे येथे निगरानीखाली ठेवले असल्याचे सांगितले.