आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘काेराेना’ची दहशत : अजिंठा-वेरूळ पर्यटनाला कोरोनाची बाधा; स्थानिकांच्या व्यवसायाला घरघर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या भीतीने विदेशीच नव्हे, देशी पर्यटकांचीही संख्या रोडावली
  • लेणीतील कर्मचारीही वावरताहेत हँडग्लोव्हज, मास्क लावून
  • रिसॉर्ट, गेस्ट हाऊसही ओस : मार्चमध्ये पयर्टकांची संख्या प्रचंड रोडावली

शरद दामोदर 

अजिंठा - जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या अजिंठा आणि वेरूळ येथील लेण्यांमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे. आजवर कधी नव्हे एवढी येथील पर्यटकांची संख्या रोडावली आहे. विदेशीच नव्हे तर देशी पर्यटकांचीही संख्या घटली आहे. १ मार्च २०१९ ते १० मार्च २०१९ या एक महिना ८ दिवसांच्या कालावधीत अजिंठा लेणीला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या ४२१८ इतकी होती. तीच संख्या या वर्षी (२०२०) याच कालावधीत हजाराने घटली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे कोरोनाचा प्रकोप वाढल्यापासून चीनचा एकही पर्यटक या दोन्ही लेण्यांमध्ये नजरेस पडला नसल्याचे लेणीत कार्यरत कर्मचाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, कोरोना रुग्णांची भारतातील वाढती संख्या पाहता पुढील काळात विदेशी पर्यटकांची संख्या आणखी घटण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. 



कोरोनाच्या भीतीने विदेशीच नव्हे, देशी पर्यटकांचीही संख्या रोडावली 


जगभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. यामुळे नेहमीच गजबजून दिसणाऱ्या अजिंठा आणि वेरूळ लेणीमध्ये प्रथमच पर्यटकांची संख्या रोडावली आहे. कोरोनाच्या भीतीने विदेशी पर्यटकच नव्हे तर देशी पर्यटकही गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळत आहेत. त्यामुळे या पर्यटनस्थळांवर व्यवसाय थाटून असलेल्या व्यवसायांनाही मोठा फटक बसत आहे.  मागील वर्षी म्हणजे २०१९ मध्ये १ फेब्रुवारी ते १०  मार्च या कालावधीत अजिंठा लेणीला २५ हजार ३८६ भारतीय व ४ हजार २१८ विदेशी पर्यटकांनी  भेट दिली होती. या वर्षी १ फेब्रुवारी ते १० मार्चपर्यंत २९ हजार १२७  भारतीय तर  ३ हजार २०२ विदेशी पर्यटकांनी अजिंठा लेणीला भेट दिली आहे. गतवर्षीची पर्यटकांची आकडेवारी पाहता सुमारे एकाच महिन्यात सुमारे हजार विदेशी पर्यटक घटल्याचे स्पष्ट होते.  हे पर्यटक लेणी पाहण्यासाठी आले तर फर्दापूरमध्ये मुक्कामाला थांबतात. आता मुक्कामाला थांबणाऱ्या पर्यटकांतही घट झाली आहे.  



रिसॉर्ट, गेस्ट हाऊसही ओस : मार्चमध्ये पयर्टकांची संख्या प्रचंड रोडावली


मागील वर्षी फर्दापूर हाॅलिडे रिसॉर्टमध्ये फेब्रुवारी महिन्यात ११६ विदेशी पर्यटक थांबले होते व  मार्च २०१९ मध्ये २१ विदेशी पर्यटक थांबले होते.  तर या वर्षी ८० विदेशी पर्यटक थांबले होते. तर गेल्या दहा दिवसांत एकही विदेशी पर्यटक मुक्कामी थांबलेला नाही.  टी पॉइंट गेस्ट हाउसला २०१९ च्या फेब्रुवारी महिन्यात १० विदेशी पर्यटक थांबले होते.  मार्चमध्ये १ तर फेब्रुवारी २०२० मध्ये केवळ ४ विदेशी पर्यटक थांबले होते.  तर गेल्या १० दिवसांत एकही पर्यटक थांबला नाही. यामुळे पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.  जे विदेशी पर्यटक अजिंठा लेणी पाहण्यासाठी आले त्यातील बहुतांश एक महिना आधीच येऊन गेले आहेत. नवीन येणाऱ्या पर्यटकांचे ग्रुप मोठ्या प्रमाणात कॅन्सल होत असल्याचे येथील व्यावसायिक सांगतात. 



अजिंठा : लेणीला भेट दिलेले पर्यटक
 
> १ फेब्रुवारी ते १० मार्चपर्यंत ३२ हजार ३२९ पर्यटकांनी भेट दिली. 
> २९ हजार १२७  भारतीय पर्यटकांनी भेट दिली.  
> ३ हजार २०२  विदेशी पर्यटकांनी अजिंठा लेणीला भेट दिली आहे. 



वेरूळ लेणी

> १ फेब्रुवारी ते १० मार्चपर्यंत १,०७,६३७,०० पर्यटकांनी वेरूळ लेणीला भेट दिली. 
> ३६४० फेब्रुवारीमध्ये भेट देणारे विदेशी पर्यटक होते. 
> २४ हजार ६२१ मार्च : पर्यटकांमध्ये 
> ६७२ विदेशी पर्यटकांचा समावेश आहे.

२० ग्रुपचे बुकिंग कॅन्सल

माझ्याकडे येणारे विदेशी पर्यटकांचे मोठे ग्रुप आता कोरोनाच्या भीतीमुळे बंद झाले आहे. गेल्या काही दिवसांत माझ्याकडे २० मोठ्या विदेशी ग्रुपचे बुकिंग झाले होते. ते आता कॅन्सल करण्यात आले आहे. मोठ्या ग्रुपचे बुकिंग कॅन्सल होत असल्याने व्यवसायाचेही मोठे नुकसान होत आहे. 
- गणेश मंडावरे, संचालक अजिंठा रेस्टॉरंट  


खास जपानी मेनू तरी पर्यटक नाह
ीत

या वर्षापासून फर्दापूर रिसॉर्टमध्ये खास जापानी पर्यटकांसाठी जापनीज मेनू सुरू केला आहे. पण विदेशी पर्यटकच कमी झाल्याने  व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. 
रामदास क्षीरसागर, व्यवस्थापक, एमटीडीसी, फर्दापूर

लेणीतील कर्मचाऱ्यांची सुरक्षा

लेणीतील सर्व कर्मचाऱ्यांना मास्क आणि  हँडग्लोव्हज दिले अाहेत. त्यांना दर दोन तासांनी हात धुऊन काळजी घेण्यास सांगितले आहे.  
डी. एस. दानवे. सहायक संवर्धक, भारतीय पुरातत्त्व विभाग.

भारतात चांगली पर्यटनस्थळे 

मी मेक्सिकोतून भारत भ्रमणासाठी आलो आहे. मला भारतात येण्यासाठी  बंदी नव्हती. मी चीनमार्गे येणार होतो. पण ते फ्लाइट रद्द करून दुसऱ्या फ्लाइटने आलो.  मी बरीच  पर्यटनस्थळे फिरलो आहे.   मला कोरोनाचा प्रभाव अधिक दिसला नाही.  मी येथून वेरूळ, औरंगाबाद असे करत अंदमानला जाणार आहे. स्वत. काळजी घेतली तर कोरोनाची काहीच भीती नाही. 
डॉ. कारलेस, पर्यटक, मेक्सिको



बातम्या आणखी आहेत...