आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटलीसाठी रविवार ठरला घातवार, एकाच दिवसात 133 लोकांचा मृत्यू; संपूर्ण देश लॉकडाउन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटलीत लॉकडाउननंतर मिलान शहरासह इतर रेल्वे स्थानकांवर शांतता पसरली - Divya Marathi
इटलीत लॉकडाउननंतर मिलान शहरासह इतर रेल्वे स्थानकांवर शांतता पसरली
  • इटलीत आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 366 लोकांचा मृत्यू, 7376 जणांना संसर्ग
  • जगभरात रविवारी सुमारे 1752 नवीन प्रकरणे समोर आली, आतापर्यंत 3,831 लोकांचा मृत्यू

बीजिंग/रोम - चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने सोमवारपर्यंत 109 देशांतमध्ये पसरला आहे. कोरोनामुळे चीननंतर इटलीत सर्वाधिक 366 लोकांचा मृत्यू झाला आहे. येथे रविवारी 133 लोक दगावले. तर 24 तासांत कोरोना संसर्गाच्या 1200 नवीन प्रकरणांची पुष्टी करण्यात आली. इटली सरकारने देशातील दीड कोटी लोकांना लॉकडाउन केले आहे. कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता कतारने 9 मार्चपासून भारतासह 14 देशांतील प्रवासावर बंदी घातली. रविवारी याबाबत घोषणा करण्यात आली. कतारने चीन, मिस्र, भारत, इराण, इराक, लेबनान, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, फिलिपाइन्स, दक्षिण कोरिया, श्रीलंका, सीरिया आणि थायलंड इत्यादी देशांतील प्रवासावर बंदी घातली आहे. कतार एअरवेजने यापूर्वीच इटलीसाठीचे सर्व उड्डाणे रद्द केली होती. कतारमध्ये आतापर्यंत 15 लोकांना व्हायरसचा संसर्ग झाला आहे.  चीनमध्ये आतापर्यंत 80,735 प्रकरणे समोर आली आहेत


माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत 1 लाख 10 हजार 92 प्रकरणांची पुष्टी करण्यात आली आहे. तर 20 देशांमध्ये 3831 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनचे आरोग्य कमीशननुसार देशात एका दिवसात 22 लोक दगावले आहेत. चीनमध्ये आतापर्यंत संसर्गाची 80,735 प्रकरणे समोर आली आहेत. दरम्यान चीनमध्ये कोरोना व्हायरसने पीडित 100 वर्षीय वृद्धाची प्रकृती पूर्णपणे बरी झाली आहे. त्यांना रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आला. चीनच्या निर्यातीत घट 

कोरोना व्हायरसमुळे मागी दोन महिन्यांपासून चीनच्या व्यापारावर वाईट परिणाम झाला आहे. निर्यातीत 17.2% घसरल आली आहे. फेब्रुवारी 2019 दरम्यान अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार युद्धानंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे. चीनच्या आयातीतही 4% कमतरता आली आहे.