आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Virus : 85 Indian Students Are Under Observation In Italy; The Worldwide Death Toll Has Gone Up To Over 3,000

भारतात संसर्गाच्या 2 प्रकरणांची पुष्टी, इटलीमध्ये 85 भारतीय विद्यार्थी डॉक्टरांच्या निगरानीत; जगभरात 3 हजारांपेक्षा जास्त मृत्यू

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इटलीमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू तर 1700 लोकांना संक्रमण झाल्याचे स्पष्ट

नवी दिल्ली/रोम/बीजिंग - भारतात दिल्ली आणि तेलंगाणा येथे कोरोनाव्हायरस संसर्गाच्या दोन प्रकरणांची पुष्टी झाली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, दिल्लीत संक्रमण आढळून आलेली व्यक्ती काही दिवसांपूर्वीच इटलीहून परतली होती. तर तेलंगाणात संक्रमण आढळून आलेली व्यक्ती दुबईहून आला होता. यापूर्वी केरळमध्ये तीन जणांना कोरानाचा संसर्ग झाल्याची पुष्टी करण्यात आली होती. मात्र आता त्यांची प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. 
चीनसोबतच इतर देशांमध्येही कोरोना व्हायरसचा कहर वाढताना दिसत आहे. इटलीच्या लोम्बार्डीमध्ये 85 भारतीय विद्यार्थी विद्यार्थी डॉक्टरांच्या निगरानीत आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1694 प्रकाराने समोर आली आहेत.
तिकडे, अमेरिकन अधिकाऱ्यांनी सोमवारी देशात दुसरा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. पब्लिक हेल्थ - सिएटल अँड किंग काउंटीने सांगितले की, शुक्रवारी एक आणि शनिवारी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच जगभरात कोरोनामुळे मरणाऱ्यांचा आकडा 3 हजारच्या पुढे गेला. तर 89,073 व्यक्ती संक्रमित झाले आहेत.लोम्बार्डीमध्ये पावियाच्या इंजीनिअरिंग विभागात एका नन-टीचिंग फॅकल्टीमध्ये संक्रमणानंतर विद्यार्थ्यांमध्ये दहशत वाढली आहे. 15 इतर स्टाफला वेगवेगळे केले आहे. बंगळुरुची एक विद्यार्थिनी अंकिता केएसने एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले, ‘‘आमच्यापैकी अर्ध्या विद्यार्थ्यांनी तिकिटे बुक केली होती, पण फ्लाट्स दरदिवशी कॅन्सल होत आहेत. नवे तिकीट खूप महागडे आहे. येथे किराणा दुकानांमध्ये वेगाने स्टॉक संपत आहे. आम्हाला भीती आहे की, परिस्थिती आणखी खराब होऊ शकते. त्यामुळे, भारत सरकारला अपील आहे की, त्यांनी आम्हाला येथून काढण्यासाठी पाऊले उचलावीत.’’माहितीनुसार, पावियामध्ये फसलेल्या 85 भारतीय विद्यर्थ्यांमध्ये 25 तेलंगणा, 20 कर्नाटक, 15 तामिळनाडू, 4 केरळ, 2 दिल्ली आणि राजस्थान, गुडगांव आणि 1-1 देहरादूनचे आहेत. यातील सुमारे 65 इंजीनिअरिंग विद्यार्थी आहेत. 

‘भारतात पोहोचल्यानंतरही लोकांना वेगवेगळे ठेवले जात आहे.’

इंडस्ट्रियल ऑटोमेशनचा विद्यार्थी पुरुषोत्तम कुमार मधु 10 मार्चला भारतात येण्यासाठी उड्डाण करणार आहे. पण याबद्दल संशय आहे की, फ्लाइट संचालित होईल की नाही.  पुरुषोत्तम म्हणाला, ‘‘मला सांगितले गेले आहे की, खाडी देशांतून जाणारी जास्तीत जास्त उड्डाणे रद्द केली जात आहेत. तसेच भारतीय विमानतळांवर पोहोचल्यानंतर तिथे 10-15 दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाणेदेखील चिंतेचा विषय आहे.’’

चीनमध्ये एका दिवसात 42 लोकांचा मृत्यू... 

चीनच्या बाहेर जास्त संक्रमणाची प्रकाराने दक्षिण कोरियामधून समोर आली आहेत. येथे 3,736 संक्रमणाची प्रकाराने समोर आली आहेत. तसेच 17 लोकांचे मृत्यू झाले आहेत. चीनमी,अधे एका दिवसात 42 लोक मृत्यू पावले. मृतांचा आकडा आता 2912 झाला आहे. तसेच सर्वात जास्त प्रभावित झालेल्या हुबेईमध्ये 2803 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. 

सिंध येथे 13 मार्चपर्यंत शाळा - कॉलेज बंद... 

कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानच्या सिंध येथील सरकारने 13 मार्चपर्यंत सर्व शाळा आणि कॉलेज बंद केले आहेत. संपूर्ण सिंधमध्ये सार्वजनिक आणि खाजगी शिक्षण संस्थान 2-13 मार्चपर्यंत बंद राहतील. विश्व स्वास्थ्य संघटना (डब्ल्यूएचओ) ने कोरोना व्हायरसला उच्च स्तरावरील संकट घोषित केले आहे. संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहेनॉम म्हणाले, ‘‘आम्ही व्हायरसचे संक्रमण आणि प्रभावाचे आकलन केल्यानंतर हे आढळून आले आहे की, जगभरासाठी हे मोठे संकट बनले आहे.’’इराणमध्ये फसलेल्या नागरिकांना परत आणणार भारत... 

इराणमध्ये कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 54 लोकांचा मृत्यू झाला आहे. येथे आतापर्यंत संक्रमणाची 385 प्रकाराने समोर आली आहेत. भारत येथे फसलेल्या पोळ्या नागरिकांना परत आणेल. विदेश राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी रविवारी म्हणाले होते की, दोन्ही देशांचे अधिकारी यावर चर्चा करत आहेत. एका रिपोर्टनुसार, सुमारे 350 कश्मीरी विद्यार्थी आणि शीख भाविक इराणहून परत येण्याची सोया झाली आहे. भारताने इराणहून येणारी जाणारी उड्डाणे निलंबित केली गेली आहेत. 

60 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला कोरोना व्हायरस... 

चीनमध्ये 80026, द. कोरियामध्ये 4212, इटलीमध्ये 1694, इराणमध्ये 978, जापानमध्ये 256, फ्रांस आणि जर्मनीमध्ये 130, सिंगापुरमध्ये 106, हॉन्गकॉन्ग मध्ये 98, अमेरिकेमध्ये 89, स्पेनमध्ये 84, बहरीनमध्ये 47, कुवैतमध्ये 45, थायलंडमध्ये 42, तैवानमध्ये 40, ब्रिटनमध्ये 36, ऑस्ट्रेलिया आणि मलेशियामध्ये 29-29, स्वित्झर्लंडमध्ये 27, कॅनडामध्ये 24, यूएईमध्ये 21, नार्वे आणि इराकमध्ये 19-19, नियतनाममध्ये 16, स्वीडन आणि ऑस्ट्रियामध्ये 14-14, इजराइल, नेदरलँड्स, मकाउ आणि लेबनानमध्ये 10-10, सेन मारिनोमध्ये 8, क्रोएशिया आणि ग्रीसमध्ये 7-7, इक्वाडोर, ओमान, फिनलँडमध्ये 6-6, मॅक्सिकोमध्ये 5, डेन्मार्क, पाकिस्तानमध्ये 4-4, कतर, चेक रिपब्लिक, जॉर्जिया, आइसलँड, फिलीपींस, रोमानिया, अजरबैजानमध्ये 3-3, बेल्जियम, रशिया, मिस्र, ब्राजीलमध्ये 2-2 व्यक्ती संक्रमित आहेत.