आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना विषाणूबाधेचे केरळमध्ये ९ नवे रुग्ण; देशातील संख्या ४१

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलबारी येथे  बांगलादेशहून येणाऱ्यांची कसून तपासणी. - Divya Marathi
फुलबारी येथे बांगलादेशहून येणाऱ्यांची कसून तपासणी.
  • राजधानीत ३३७ लोकांना वेगळ्या वॉर्डात ठेवले, तामिळनाडूत १ रुग्ण
  • कोरोनाचा इशारा, दक्षतेची सूचना देणाऱ्या कॉलर ट्यून सर्व मोबाइलवर सुरू

नवी दिल्ली/ तिरुवानंतपुरम - देशभरात रविवारी कोरोना विषाणूबांधेचे (कोविड-१९) ७ नवे रुग्ण आढळले. यातील ५ केरळमध्ये, तर एक तामिळनाडूत आढळून आला. केरळमधील पाचपैकी तिघे नुकतेच इटलीहून परतले होते, तर तामिळनाडूतील एक जण ओमानहून परतला होता. दरम्यान, दिल्लीत कोरोनाबाधेच्या रुग्णांची संख्या दोनवरून तीन झाली. दुसरीकडे अरुणाचल सरकारने राज्यात परदेशी प्रवाशांना बंदी घातली असून प्रोटेक्टेड एरिया परमिट (पीएपी) बंद करण्यात आले आहे. दरम्यान, दिल्लीत तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे लक्षात आल्यानंतर हे तिघे ज्या लोकांच्या संपर्कात आले त्या ३३७ जणांना वेगळ्या वॉर्डात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.इटलीमध्ये लोकसंख्येच्या २५ टक्के  लोकांना वेगळे ठेवले : इटलीमध्ये कोरोनाचा फैलाव पाहता सरकारने एकूण लोकसंख्येच्या २५ टक्के म्हणजे सुमारे १.६ कोटी लोकांना वेगळे ठेवले आहे. गेल्या आठवड्यात देशातील सर्व शाळा, विद्यापीठे १० दिवस बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. युरोपात कोरोनाची बाधा झालेले सर्वाधिक म्हणजे साडेचार हजारांवर रुग्ण एकट्या इटलीत सापडले आहेत. मंगळुरू पोर्टने जहाजाला परवानगी नाकारली
 
> पनामाचा झेंडा असलेल्या एका जहाजाला मंगळुरू पोर्टने रविवारी परवानगी नाकारली. या पोर्टवर परदेशी जहाजांना केंद्र सरकारने बंदी घातली आहे. { उत्तराखंड आरोग्य विभगाच्या सूचनेनुसार राज्यात सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत.> कॉलपूर्वी सर्व मोबाइलवर कोरोनाचा इशारा आणि सुरक्षिततेचे उपाय सांगणाऱ्या कॉलर ट्यून सुरू करण्यात आल्या आहेत.