आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Virus : Bollywood Celebrity, Bipasha Basu, Sonali Bendre Canceled Their US Travel

ट्रॅव्हलिंग करणे टाळत आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी, बिपाशा बासु, सोनाली बेंद्रेने रद्द केला अमेरिका प्रवास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : जगभरात कोरोना व्हायरसचा वाढता कहर पाहता बॉलिवूड सेलिब्रिटी आता ट्रॅव्हलिंग करणे टाळत आहेत. हा व्हायरस चीन, इटली, अमेरिकासह इतर देशांमध्ये वेगाने पसरत आहे. अशात कुणीही रिस्क घेऊ इच्छित नाही. कोरोनाच्या भीतीनेच बिपाशा बासु आणि सोनाली बेंद्रेने आपला अमेरिका प्रवास रद्द केला आहे.  

बिपाशाला साऊथ एशियन वुमन एम्पावरमेंट अवॉर्डमध्ये भाग घेण्यासाठी 22 मार्चला न्यू जर्सी, फेर्मोंट आणि न्यूयॉर्कचा प्रवास करायचा होता पण बिपाशाने इव्हेन्ट आयोजकांना याला पोस्टपोन करण्याची विनंती केली आणि ती मान्य केली गेली. याव्यतिरिक्त बिपाशाने आणखी एका इव्हेन्टमध्ये भाग घेणार नसल्याचे इंस्टाग्रामवर स्पष्ट लिहिले, 'कोरोना व्हायरसमुळे, स्टार इनफिनिटी आर्ट एक्सिबिट आणि त्याचा प्रिव्ह्यू पोस्टपोन केला आहे. हा निर्णय सरकारने जारी केलेल्या सूचना लक्षात घेऊन घेतला गेला आहे ज्यामध्ये एका जागी अनेक लोकांची गर्दी ना हौस देण्याची सल्ला दिला गेला आहे. नव्या तारखांची घोषणा लवकरच केली जाईल. सर्वात महत्वाची गोष्ट, लक्ष ठेवा आणि सुरक्षित राहा.'

सोनालीलादेखील वुमन्स डे स्पेशल इव्हेंटमध्ये भाग घेण्यासाठी न्यूयॉर्क आणि डलास येथे जायचे होते. पण हा इव्हेंटदेखील रद्द केला गेला. सोनालीव्यतिरिक्त ऋतिक रोशन, सलमान खानलादेखील एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात न्यूयॉर्कमध्ये एका इव्हेंटमध्ये परफॉर्म करायचे होते पण हा इव्हेंटदेखील आता कोरोनामुळे कॅन्सल होऊ शकतो. नेहा कक्कडदेखील अटलांटिक सिटी, न्यू जर्सीमध्ये 11 एप्रिलला परफॉर्म करणार आहे पण अद्याप हा इव्हेन्ट कॅन्सल होण्याची सूचना समोर आलेली नाही. 

बातम्या आणखी आहेत...