आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Virus : Canada PM Justin Trudeaus Wife Sophie Tested Positive For Coronavirus

कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो यांच्या पत्नीस कोरोनाची लागण, पीएम देखील आयसोलेशनमध्ये राहणार; जगभरात मृतांची संख्या 5 हजारच्या जवळपास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी सोफी सोबत कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो (फाईल) - Divya Marathi
पत्नी सोफी सोबत कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो (फाईल)
  • सोफी ग्रेगोर ट्रूडो मंगळवारपासून आजारी होत्या, गुरुवारी उशीरा रात्री कोरोना झाल्याची पुष्टी झाली
  • पंतप्रधान ट्रूडो यांनाही आयसोलेशनमध्ये ठेवले, ते घरातूनच सरकारी कामे सांभाळणार

टोरंटो - कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या पत्नी सोफी यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. कॅनडाच्या आरोग्य मंत्रालयाने एक निवेदन जारी करत याची पुष्टी केली. सोफी यांच्यासोबत आता जस्टिन देखील आयसोलेशनमध्ये राहणार आहेत. ते घरातून सरकारी काम सांभाळतील. सोफी मंगळवारी लंडनहून परतल्या होत्या. तेव्हापासून त्या आजारी पडल्या. गुरुवारी त्यांच्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दुसरीकडे, जगात कोरोनाव्हायरसमुळे मृतांचा आकडा 4973 वर पोहोचला आहे. तर 1 लाख 34 हजार 679 प्रकरणे समोर आली आहेत. सोफी यांची प्रकृती स्थिर


कॅनडा सरकारने सांगितले की, "सोफी यांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा चांगली आहे. त्यांना आवश्यक खबरदारी घेण्यास सांगितले आहे. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत." दरम्यान पंतप्रधान कार्यालयाने देखील एक निवेदन जारी केले. त्यात म्हटले की, "पंतप्रधान स्वस्थ आहेत. त्यांच्यात कोणत्याही रोगाची लक्षणे आढळली नाहीत. डॉक्टरांनी त्यांना 14 दिवसांपर्यंत आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे." गुरुवारी कॅनडात कोरोना व्हायरसचे नवीन 35 प्रकरणांची पुष्टी झाल्यानंतर कोरोना व्हायरस संसर्गित लोकांची संख्या आता 138 वर गेली आहे.                                     

स्पॅनिश मंत्र्यांना देखील कोरोनाव्हायरसची लागण 

स्पेनचे मंत्री इरेन मोन्टेरो यांना देखील कोरोनाची लागण झाली. सरकारने गुरुवारी सांगितले की, समानता मंत्री मोन्टेरो यांची कोरोनाव्हायरस संसर्गाच्या तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. मोन्टेरो यांना त्यांचा एक साथीदार, उपपंतप्रधान कार्मेन काल्व्हो आणि पॉडमेस पक्षाचे नेते पॅबलो इग्लेसियास यांच्यासोबत क्वारँटाइनमध्ये ठेवले आहे. यानंतर सरकारच्या सर्व मंत्र्यांना कोरोना व्हायरसची तपासणी करण्यास सांगितले आहे. आतापर्यंत स्पेनमधील 2,200 लोकांना कोरोनाव्हायरस संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे आणि 55 जणांचा मृत्यू झाला आहे.बातम्या आणखी आहेत...