आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Virus, Chance Of Rain; Only Sixteen Thousand Tickets Sold; India And The South. Africa First Match Today At The Dharamshala

कोराेना व्हायरस, पावसाची शक्यता; केवळ सोळा हजार तिकीट विक्री; भारत व द. आफ्रिका पहिला सामना आज धर्मशाळेत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर चेंडूवर लाळ लावण्याचा निर्णय : भुवनेश्वर
  • २२ हजार क्षमतेचे स्टेडियम, प्रसारण १.३० वाजेपासून
  • हार्दिक पांड्या व शिखर धवनवर नजरा

धर्मशाळा - भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला वनडे गुरुवारी धर्मशाळा येथे खेळवण्यात येईल. कोरोना व्हायरसचा धोका आणि धर्मशाळा येथील पावसाची शक्यता असल्याने आतापर्यंत १६ हजार तिकिटांची विक्री झाली. स्टेडियममध्ये प्रेक्षकांची क्षमता २२ हजार आहे. अद्याप यात ऑनलाइन तिकिटांच्या आकड्याचा समावेश नाही. हिमाचल क्रिकेट संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने म्हटले की, आम्ही जवळपास १६ हजार तिकिटांची विक्री केली. येथील आंतरराष्ट्रीय सामन्याच्या तिकिटाला मोठी मागणी असते, मात्र कोरोना व्हायरसमुळे यंदा कमी झाली आहे. अधिकाऱ्याने म्हटले की, ‘विदेशातील जवळपास १ हजार चाहते कोरोना व्हायरसमुळे येणार नाहीत. पंजाब, हरियाणा व दिल्लीचेदेखील चाहते मोठ्या संख्येने येथे येतात. मात्र, त्यात कमी झाली आहे.’ दक्षिण आफ्रिकेतून अनेक पत्रकारदेखील यंदा येणार नाहीत. आयोजकांकडून स्टेडियमच्या आत व बाहेर कोरोना व्हायरसबाबतीत बॅनर लावले आहेत. सामन्यात पावसाची शक्यता आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये येथे पावसामुळे भारत व द. आफ्रिका यांच्यातील टी-२० सामन्यात एकही चेंडू टाकला गेला नव्हता. बीसीसीआयच्या वैद्यकीय चमूनेदेखील कोरोना व्हायरसबाबतीत सूचना केल्या आहेत. खेळाडूंना हॉटेलमध्ये खाणे, चाहत्यांशी हात मिळवणे, त्याच्या मोबाइलमध्ये सेल्फीवर बंदी घातली. हार्दिक पांड्या व शिखर धवनवर नजरा 
 
भारताला न्यूझीलंड दौऱ्यात वनडे मालिकेत ०-३ ने पराभव स्वीकारावा लागला. अशात संघाला येथे प्रदर्शन सुधारण्याची आवश्यकता आहे. पाठीच्या दुखण्यामुळे विश्वचषकानंतर पहिल्यांदा हार्दिक पांड्या कोणता वनडे सामना खेळेल. सलामीवीर शिखर धवन व वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार या मालिकेत परतले आहेत. या वर्षी भारत कसोटी चॅम्पियनशिप व टी-२० वर अधिक लक्ष देत आहे. याच वर्षी टी-२० विश्वचषक होणार आहे. दोघांतील अखेरच्या १० वनडेपैकी भारताने ८ आणि दक्षिण आफ्रिकेने २ सामने जिंकले. दोन अष्टपैलूंसह भारत मैदानात उतरू शकतो


भारत पहिल्या सामन्यात दोन अष्टपैलू रवींद्र जडेजा व हार्दिक पांड्यासह मैदानात उतरू शकतोे. त्यासह भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी, यजुवेंद्र चहल, बुमराह गोलंदाज म्हणून खेळू शकतील. धवनसोबत पृथ्वी शॉ सलामी देईल. त्यानंतर कोहली, अय्यर, लाेकेश राहुल उतरतील. बुमराह व भुवनेश्वरचे ३१ सामन्यांत विजय 
 
भुवनेश्वर व बुमराह आतापर्यंत ४१ वनडेत उतरले. यात टीमने ३१ सामन्यांत विजय मिळवला आणि केवळ १० मध्ये पराभव झाला. ही जोडी पुन्हा एकदा आपल्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. चहलने द. आफ्रिकेविरुद्ध ७ सामन्यांत २० विकेट घेतल्या. हे कोणत्याही संघाविरुद्ध चांगले प्रदर्शन ठरले.
 

मलानने शतक करत संघात मिळवले स्थान 
 
मलानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वनडेत शतक करत संघाला जिंकवले होते. त्याला द. आफ्रिका संघात १६ वा खेळाडू म्हणून स्थान मिळाले. त्यानंतर स्मट्सने चांगल्या प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष्य वेधले. कर्णधार डिकॉक, डुप्लेसिस व क्लासेन महत्त्वाचे खेळाडू आहेत.
 

डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर चेंडूवर लाळ लावण्याचा निर्णय : भुवनेश्वर

कोरोना व्हायरसमुळे भुवनेश्वरने म्हटले की, सामन्यात चेंडू चमकावण्यासाठी लाळेचा उपयोग करायचा की नाही, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर निर्णय घेईल. आम्ही लाळ न लावल्यास साइन चमकदार राहण्याचा उपयोग होत नाही. दुसरीकडे, द. आफ्रिकेच्या डी कॉकने म्हटले, सर्व खेळाडू तंदुरुस्त आहेत. आम्ही पूर्वीप्रमाणे चेंडूचा वापर करू.