आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Virus: Chicken And Eggs Are Safe To Eat, Enhances Immunity; Scientists Reveal

चिकन आणि अंडे सुरक्षित, रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यास होते मदत; शास्त्रज्ञांनी केला खुलासा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मांसाहार घेतल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते, कोरोनाचा यावर परिणाम नाही

नवी दिल्ली- चीनमधून सुरू झालेला कोरोना हळु-हळू 100 पेक्षा जास्त देशात पसरला आहे. भारतातही कोरोनाचे 70 पेक्षा जास्त रुग्ण आढळले असून दोन जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरस मांसाहारी पदार्थातून झाला असे समजून देशात मांसाहार खाणे कमी झाले आहे. यामुळे सर्वात जास्त फटका पोल्ट्री व्यवसायाला झाला आहे. यातच शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की, पोल्ट्री व्यवसायाचा आणि कोरोना व्हायरसचा काहीही संबंध नाही. तसेच, चिकन आणि अंडे खाणे सुरक्षित आणि पौष्टिक आहे. 

हैदराबादच्या पोल्ट्री संशोधन संचालनालयातील शास्त्रज्ञांनी सांगितले की, रोग प्रतिकाकर क्षमता कमी झाल्यावर कोरोना व्हायरस हल्ला करू शकतो. त्यामुळे मांसाहारी लोकांची रोग प्रतिकारक क्षमता जास्त करण्यासाठी मांसाहार करणे आवश्यक आहे. त्यांनी कमी मसाले आणि तेलात चांगले शिजलेले चिकन किंवा अंडे खाण्याचा सल्ला दिला आहे.

संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ एम आर रेड्डी आणि चंदन पासवानने सांगितले की, चिकन आणि अंड्यात ‘हाय क्वालिटी प्रोटीन’ असते, ज्यामुळे शरीरात अँटीबॉडी निर्माण होतात. यामुळे शरीरात नैसर्गिक पद्धतीने रोग प्रतिकारक क्षमता निर्माण होते. चिकन आणि अंडी खाणाऱ्या लोकांमध्ये कोरोनाचे लक्षणे आढळले, तरीदेखील रोग प्रतिकारक क्षमता जास्त असल्यामुळे रोग लवकर बरा होण्यास मदत मिळले.

डॉ. रेड्डी आणि डॉ. पासवानने पुढे सांगितले की, पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांना उच्च गुणवत्तेचा संतुलीत आहार दिला जातो, ज्यात विटामिन, खनिज आणि इतर पोषक घटक असतात. यामुळे त्यांचा वेगाने शारिरिक विकास होतो. अनेक माध्यमातून अफवा पसरवल्या जात आहेत की, चिकन आणि अंडे खाल्याने कोरोनाचा धोका आहे. पण, कोरोनाचा आणि कोंबंड्यांचा काहीच संबंध नाही. आतापर्यंक पोल्ट्री फॉर्ममध्ये काम करणाऱ्या एकाही व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत.

यादरम्यान पशुपालन, डेअरी आणि मत्स्य पालन मंत्री गिरिराज सिंह आणि राज्य मंत्री संजीव कुमार बालियान यांनीदेखील सांगितले की, अफवा पसरवल्यामुळे पोल्ट्री व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. चिकन आणि अंडी सर्वांसाठी सुरक्षित आहेत, याचा कोरोनाशी काहीच संबंध नाही. केंद्र सरकारने यासंबंधी राज्य सरकारच्या संपर्कात आहे आणि वेळोवेळी योग्य सल्ले दिले जात आहेत.

पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडियाने पशुपालन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांना पत्र पाठवून म्हटले की, चिकन आणि अंड्यांच्या किमतीत घट झाल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात पोल्ट्री उद्योगाला 3600 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. फेडरेशनचे अध्यक्ष रमेश चंदर खत्री आणि सचिव रनपाल सिंहने सांगितले की, फार्म गेटवर चिकन 10 ते 15 रुपये किलो भावाने विकले जात आहे. पण, एक किलोग्राम चिकन तयार करण्यासाठी 80 रुपये खर्च येतो. 


फेब्रुवारीमध्ये 3000 कोटी चिकनमधून आणि 600 कोटी अंड्यातून नुकसान झाले आहे. देशात रोज अंदाजे 25 कोटी अंडे आणि 20 हजार टन चिकन तयार होते. यात पोल्ट्री उद्योगाशी संबंधित सूत्राने सांगितले की, पाच मोठ्या कंपन्यात आपापसातील वर्चस्व वादामुळे मागील एका वर्षापासून जास्तीचे चिकन उत्पादन करत आहे, यामुळे लहान व्यापाऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. त्यांनी यावेळी पोल्ट्रीवर दिल्या जाणारे कर्ज फेडण्यासाठी वाढीव वेळ मागितला आहे.

बातम्या आणखी आहेत...