आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणतीही जोखीम घेऊ नका, आणि घाबरू नका

एका वर्षापूर्वीलेखक: एन. रघुरामन
  • कॉपी लिंक

कोरोना व्हायरसच्या वाढत्या चिंतेने प्रथम़च लहानमोठ्या आणि सर्वच प्रकारच्या कार्यक्रमांचे रूप बिघडवले आहे. बुधवारी रात्री मला एक ई-मेल आणि व्हॉट॰सअॅप मेसेज आणि नंतर एक पर्सनल कुरिअर मिळाले. यात वधू-वरांच्या पालकांच्या हस्ताक्षरातील नम्रतेने लिहिलेले पत्र होते, ज्यात लिहिलेले होते की, ‘आम्हाला हे माहीत आहे की, तुम्ही आमच्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी आणि विवाह उत्सव साजरा करण्यासाठी येत आहात. तुमच्या येण्याने आम्हाला निश्चितच आनंद होईल. पण पाहुण्यांची सुरक्षा आणि त्यांचे आरोग्य जपणे याला आम्ही प्राधान्य देतो. यासाठी आम्ही रिसेप्शन पुढे ढकलत आहोत. पण आम्ही रिसेप्शन रद्द केलेले नाही. तुम्हाला नवी तारीख लवकरच कळवू. ही परिस्थिती समजून घ्याल अशी आशा आहे....’ मी समजू शकतो की, गर्दीच्या जाहीर बैठकांबाबत कोणी जोखीम घेऊ इच्छित नाही. व्हायरसच्या भीतीमुळे आमच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधान कार्यालयांनीही या वेळी ‘होली मिलन’ कार्यक्रम आयोजित न करणे किंवा त्यात भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरस इन्फेक्शन ७० देशांमध्ये पोहोचले आहे. विविध शहरांमधील मोठ्या क्लबमध्येही होळीच्या निमित्ताने होणाऱ्या पार्ट्या रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. कारण बहुतेक क्लबचे सदस्य आणि त्यांचे पाहुणे प्रवास बराच करतात आणि बिझनेस टूरअंतर्गत विदेशात त्यांचे येणे-जाणे असते. त्यामुळे त्यांच्यापैकी कुणी व्हायरसमुळे बाधित होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. जगभरातील विशेषज्ञ कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी गर्दीची ठिकाणे टाळण्याचा सल्ला देत आहेत. बहुतेक कॉर्पोरेट ऑफिसेसनी आपल्या कार्यालयातील नोटीस बोर्डांवर ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ अशा सूचना लावल्या आहेत. संयुक्त राष्ट्राने तर म्हटले आहे की, या व्हायरसच्या भीतीमुळे जागतिक पातळीवर शिक्षणाचे अभूतपूर्व नुकसान होत आहे. तीन महाद्वीपांमधील जास्तीत जास्त देशांनी वेगवेगळ्या संख्येने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने संयुक्त राष्ट्रांनी हा इशारा दिला. अमेरिकेच्या लॉस एंजलिसमध्ये तर बुधवारी आणीबाणीची स्थिती जाहीर केली गेली. स्पष्टच सांगायचं झालं तर एखाद्या आधुनिक अर्थव्यवस्थेने दीर्घकाळासाठी राष्ट्रीय स्तरावर शाळा बंद ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. दुसऱ्या बाजूला सोशल मीडिया आम्हाला हा विश्वास देण्याचा प्रयत्न करत आहे, कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण मानवजातच धोक्यात आली आहे. यात काही सत्यता नसली तरी या स्थितीमुळे सावध होण्याची वेळ निश्चितच आली आहे. स्मार्टफोन वापरणाऱ्या गर्दीकडे संयम नावाचा गुण असत नाही. यासाठी प्रत्येक माहितीकडे साशंक नजरेनेच पाहिले पाहिजे. अशा काळात चुकीची माहिती हाच मोठा धोका आहे. यात एक महत्त्वाचे काम सर्वच लोक करू शकतात, ते म्हणजे हात मिळवण्याऐवजी नमस्कार करणे. काही काळासाठी मांसाहारी लोकांनी शाकाहार करावा. कमीत कमी तुळशीची पाने खा, धूम्रपान बंद करा, शक्य असेल तेव्हा लिंबाचे सरबत प्या, मद्यप्राशन करू नका, बाहेरचे खाण्याऐवजी घरचेच अन्न खा, फास्ट फूडपासून दूर राहा आणि जितक्या वेळा शक्य असेल तितक्या वेळा हात धुवा. गरज असेल तेव्हाच सार्वजनिक ठिकाणी जा. सामानांची पाकिटेही धुवा.  

फंडा असा : कोणतीही जोखीम घेऊ नका, पारंपरिक पद्धती वापरा आणि घाबरू नका.

बातम्या आणखी आहेत...