आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा मराठी कलाकार एकत्र येऊन धुळवड साजरी करणार नाहीत, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मराठी कलाकारांचा निर्णय

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः कोरोनाची दहशत सध्या संपूर्ण जगभरात पसरल्याचे पाहायला मिळते. अनेक देशांमध्ये कोरोनाचा फटका वाहतूक, पर्यटन व्यवसाय, उद्योगधंदे यांच्यावर हळूहळू बसत असल्याचे पाहायला मिळते. भारतात मनोरंजन विश्वालाही याची झळ पोहोचली आहे. याचाच फटका म्हणून आता मराठी कलाकारांनी  एकत्र येऊन धुळवड साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होळी न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आता याच पार्श्वभूमीवर हिंदीसह मराठी कलाकारांनी देखील होळी न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.


येत्या 10 मार्च रोजी धुलिवंदनाचा सण आहे. दरवर्षी मराठी कलाकार एकत्र धुळवड साजरी करत असतात. शिवाजी पार्क, गोरेगाव या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. यंदा मात्र कलाकार गर्दी न करता छोट्या छोट्या गटांमध्ये हा सण साजरा करणार असल्याची माहितीअभिनेते जयवंत वाडकर यांनी ही माहिती दिली आहे.