कोरोना विषाणू / ऑटो पार्ट्सच्या चीनकडून होणाऱ्या पुरवठ्यावर परिणाम; देशात वाहन उत्पादनात ८.३% घट

  • १० ते ३०%अॉटो पार्ट्सचा पुरवठा चीनमधून
  • भारतीय वाहन उद्योगासाठी ऑटो पार्ट्सचा चीन सर्वात मोठा पुरवठादार
  • रोग्यप्रणाली पाहता चीनपेक्षा भारतात जास्त वेगाने होईल संसर्ग

वृत्तसंस्था

Feb 14,2020 09:37:00 AM IST

नवी दिल्ली - आधीच संकटात सापडलेल्या वाहन उद्योगासाठी कोराेना विषाणूने नवी समस्या निर्माण केली आहे. फिच सोल्यूशन्सने चीनमधील कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे २०२० मध्ये देशांतर्गत वाहन निर्मितीत ८.३% घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. चीनमधील या विषाणू संसर्गामुळे वाहनांचे सुटे भाग बनवणाऱ्या कंपन्यांनी उत्पादन थांबवले आहे. त्यामुळे भारतासोबत जगभरातील वाहन उद्योगावर परिणाम होत आहे. जपानमध्ये निसान आणि दक्षिण कोरियात ह्यंडेलाही वाहनाच्या सुट्या भागाच्या कमतरतेमुळे आपले कारखाने काही दिवस बंद करावे लागले. फिचने सांगितले की, भारतात कोरोना विषाणू पसरल्यास देशाची आरोग्य प्रणाली पाहता चीनच्या तुलनेत त्यांचा येथे जास्त संसर्ग होईल. देशांतर्गत वाहन उद्योगावर जास्त व्यापक परिणाम पाहायला मिळतील.

भारतीय वाहन उद्योगासाठी ऑटो पार्ट्््सचा चीन सर्वात मोठा पुरवठादार


फिचने सांगितले की, चीन भारतीय वाहन उद्योगासाठी सुट्या भागाचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. अशा स्थितीत तयार सांगाड्याच्या कमतरतेमुळे भारतीय वाहन उद्याेगाच्या उत्पादनात घट झाल्याने भारतीय वाहन उद्योगाच्या उत्पादनाची गती कमी करणे किंवा बंद करावी लागू शकते. या कारणांमुळे २०२० मध्ये देशातील वाहन निर्मितीत ८.३% घट होण्याचा अंदाज आहे. २०१९ मध्ये यात १३.२ टक्क्यांची घसरण नोंदली. चीन भारताच्या ऑटो पार्ट््सच्या गरचेच्या १० ते ३०% पुरवठा करतो. इलेक्ट्रिक वाहनात दोन किंवा तीनपट जास्त असतो.

या परिस्थितीत भारतासाठी निर्यात वाढवण्याच्या संधी : के. सुब्रमण्यन

मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी सांगितले की, चीनमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे भारतासाठी निर्यात वाढण्याच्या चांगल्या संधी मिळू शकतात. भारत, आशियात चीनचा प्रमुख व्यापार भागीदारांपैकी एक आहे आणि त्यांचा चीनसोबत व्यापार तोटाही खूप जास्त आहे. सुब्रमण्यन यांनी कोलकात्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये म्हटले की, काय होईल हे सांगणे कठीण आहे.

X
COMMENT