आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Corona Virus Impact On Share Market And China Economy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पहिल्या तिमाहीत चीनची वाढ २ % घटणार, जागतिक आर्थिक वृद्धी २ % कमी हाेणार

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

बीजिंग - वुहानमधून पसरत चाललेल्या काेराेना व्हायरसची लागण झालेल्या चीनसह जगभरात संख्या वाढत जात आहे. काेराेना व्हायरसच्या भयानक संसर्गामुळे २०० पेक्षा जास्त बळी गेलेले आहेत. तया वाढत चाललेल्या संसर्गाने केवळ माणसांनाच नाही तर आता शेअर बाजारांपर्यंत आपला संसर्ग पाेहचवला आहे.या संसर्गामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेचे नुकसानही वाढत आहे. पूर्ण वुहान शहर सध्याच्या घडीला लाॅकडाऊन स्थितीमध्ये आहे. या शहरात राहणाऱ्या जवळपास १.१ काेटी लाेकसंख्येवर अनेक प्रकारचे निर्बंध घालण्यात आले आहेत. आॅक्सफर्ड इकाॅनाॅमिक्स या ब्रिटनच्या संस्थेनुसार या संसर्गामुळे या वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये चीनचा वृद्धिदर २ % कमी हाेईल.संसर्ग झाल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या पहिल्या अहवालानुसार जानेवारी  ते मार्च तिमाहीमध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेत ६ % दराने वाढण्याचा अंदाज हाेता. आता हा अंदाज कमी करून आता ४ टक्के करण्यात आला आहे. इतकेच नाही तर पूर्ण वर्षासाठी चीनच्या जीडीपी वाढीचा अंदाज घटविण्यात आला आहे. वर्षभरापूर्वी हा अंदाज ६ % हाेता. आता ताे ५.६ % वर आला आहे. आॅक्सफर्ड इकाॅनाॅमिक्सच्या मते चीन संसर्गाशी निगडीत सर्व वाईट शंका टाळण्यात यशस्वी हाेईल असे गृहित धरून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जर असे झाले नाही तर चीनसह जगभरातील सर्व अर्थव्यवस्थांना आणखी नुकसान सहन करावे लागेल अशी भिती जगभरात व्यंक्त करण्यात येत  आहे.


क्रूड तेलाच्या  किमतीत १६ टक्के घसरण; उत्पादक देशांंवर कपात करण्याची
वेळ


सध्याच्या घडीला चीन पेट्राेलियम उत्पादनांची सर्वात जास्त विक्री करणारा देश आहे. परंतु, काेराेना व्हायरसमुळे चीनच्या क्रुडची मागणी १० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत दाेन आठवड्यांत १६ टक्क्यांनी घसरल्या आहेत. २० जानेवारीला ब्रेंड क्रूड तेलाची किंमत प्रती बॅरल ६५.२० डाॅलर हाेती आता ती प्रती बॅरल ५५.४७ डाॅलरवर आली आहे.बांंधकाम साहित्याच्या किमती घटल्या, विकसनशील देशांवर परिणाम


काेराेना व्हायरसमुळे चीनच्या बांधकामावर परिणाम झाला आहे. स्टीलची मागणी कमी झाली. त्याचबराेबर तांब्याची मागणी घटली आहे. दाेन आठवड्यांपूर्वी तांब्याच्या किमतीत जवळपास १३ % घसरण झाली. या साहित्यामध्ये बहुतांशपणे पुरवठादार देश विकसनशीलच्या श्रेणीत येतात. त्यामुळे चीनमध्ये झालेल्या या संसर्गाचा परिणाम या देशांवर सर्वात जास्त झाला आहे

 

जगभरातील शेअर बाजार गडगडले, चीनमध्ये ८ %पेक्षा जास्त घसरण
 
काेराेेना व्हायरसच्या संसर्गापासून शेअर बाजारही वाचू शकले नाहीत. अमेरिका, जर्मनी, ब्रिटन सारख्या विकसित देशातील शेअर बाजार याच्या परिणामांमुळे घसरले आहेत. भारतीय शेअर बाजार दाेन आठवड्यांपूर्वी ज्या स्थितीमध्ये हाेते त्याच स्थितीत राहिले. त्या आधी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सातत्याने वाढ हाेत हाेती. दीर्घ सुटीनंतर चीनचे शेअर बाजार उघडले त्यावेळी त्यात ८ % घट झाली.