आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना व्हायरस भारतात? चीनहून देशात परतलेले 83 जण डॉक्टरांच्या देखरेखीत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/बीजिंग : चीनमध्ये कोरोना व्हायरसचा मोठा उद्रेक झाला असून २६ जणांचा मृत्यू झाला आहे. हा जीवघेणा व्हायरस आता भारतातही दाखल होण्याची शंका आहे. चीनहून केरळमध्ये परतलेलेल्या ८० जणांना संसर्गाच्या शंकेने डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे. मुंबईतही तीन प्रवाशांत सौम्य लक्षणे दिसल्याने रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे.

मुंबई विमानतळावर चीनमधून आलेल्या १७८९ प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग झाली. आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, 'स्क्रीनिंगनंतर ६ प्रवाशांची तपासणी झाली. चौघे निरोगी आढळले असून सर्दी व खोकल्याची लक्षणे असलेल्या दोघांना आयसोलेशन वॉर्डात ठेवले आहे. तथापि, आतापर्यंत भारतात कुणालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झालेले नाही.' दरम्यान, अतिरिक्त मनपा आयुक्त सुरेश काकाणी यांनी हाँगकाँगवरून परतलेल्या एकाला रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले.

भारत : २०,८४४ प्रवाशांची स्क्रीनिंग

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, २४ जानेवारीपर्यंत ९६ विमानांतील २०,८४४ प्रवाशांची स्क्रीनिंग करण्यात आली आहे. शुक्रवारी १९ विमानांतील ४,०८२ प्रवाशांची स्क्रीनिंग झाली.

चीन : ८८१ जणांना संसर्ग

चीनमध्ये मृतांचा आकडा २६ वर गेला आहे. ८८१ जणांना संसर्गाचे निदान झाले. संपूर्ण देशात एकूण १०७२ प्रकरणांत संसर्गाचा संशय आहे. प्रवासावर निर्बंध लावण्याने ४.१ कोटी लोकांना फटका बसला.
 

बातम्या आणखी आहेत...