आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हँडशेक करो-ना : शरद पवार यांनी लांबूनच ‘जोडले हात’; देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ३४ वर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अफवांवर विश्वास ठेवू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या - पंतप्रधान मोदी
  • अॅपलचे १२ हजार कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याचे निर्देश

नवी दिल्ली - देशात शनिवारी कोरोना व्हायरसची आणखी तीन रुग्णांना बाधा झाल्याचे निदान झाले. यातील दोघे लडाखचे तर एक जण तामिळनाडूतील आहे. यामुळे देशातील कोरोनापीडित रुग्णांची संख्या ३४ झाली. यापैकी केरळमधील तीन रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. याशिवाय, इटलीहून परतलेल्या पंजाबच्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांचा पुण्यातील लॅबमधून अहवाल अद्याप यावयाचा आहे. दुसरीकडे, जम्मू प्रशासनानेही दोन रुग्णांना ही बाधा झाल्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा परिस्थितीत अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले आहे. मोदी म्हणाले, “अशा काळात अफवा वेगाने पसरतात. कुणी म्हणते हे खा, ते खाऊ नका. काही लोक नवीन पदार्थांचे महत्त्व सांगून ते खाल्ल्यावर कोरोनाची बाधा होत नसल्याचे सांगतात. अशा अफवांपासून दूर राहा. फक्त डॉक्टरांचा सल्ला माना. स्वत: डॉक्टर होऊ नका.’ मोदी म्हणाले, जगभर आता हस्तांदोलनाऐवजी नमस्कार करण्याची सवय लावून घेतली जात आहे. आपल्यालाही या निमित्ताने नमस्काराची सवय लावून घेण्याची ही चांगली संधी आहे. कोरोनाशी लढा अन् विविध उपाययोजना 
 
> इंडिगोने आपल्या प्रवाशांना १२ ते ३१ मार्चदरम्यान प्रवासाची तारीख बदलली तर शुल्कमाफी जाहीर केली आहे. 
> दूरसंचार विभागाने टेलिकॉम कंपन्यांना कॉलर ट्यूनऐवजी कोरोना व्हायरसबद्दल जागरुकता निर्माण करणाऱ्या ऑडिओ क्लिप ऐकवाव्यात, असे निर्देश दिले.
> दिल्लीत गुरुद्वारा प्रबंधन कमिटी गुरुद्वारांत मोफत मास्क वाटणार आहे. फेसबुक व इन्स्टाग्रामने फेस मास्कच्या जाहिरातींवर बंदी घातली आहे.
> कोरोनाच्या तपासणीसाठी देशभर ५२ लॅब सुरू असून सँपल जमा करण्यासाठी ५७ लॅबना अधिकार देण्यात आले आहेत.हँडशेक करो-ना : शरद पवार यांनी लांबूनच ‘जोडले हात’

मुंबई - कोरोना व्हायरसच्या धसक्याने जगाने आता भारताचा नमस्काराचा शिष्टाचार अवलंबला आहे. वाय. बी. चव्हाण प्रतिष्ठान येथील कार्यक्रमात एका व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी पुढे आली. मात्र पवारांनी त्याला लांबूनच हात जोडले. यामुळे सभागृहात मात्र चांगलाच हशा पिकला.इराणहून परतलेले दांपत्य रुग्णालयात
 
नागपूरचे अश्फाक अहमद सौदागर (५०) व त्यांची पत्नी सुलताना बेगम (४५) यांनी इराणहून परतल्यावर कोरोनाची चाचणी केली नाही. शनिवारी ते नांदेडच्या सोनापीर बाबा दर्ग्याच्या उरुसात पोहोचले. पोलिसांनी त्यांना माहूरला रुग्णालयात दाखल केले. दोघांचीही प्रकृती उत्तम असून कोरोनाची लक्षणे नाहीत.

आयपीएलही लांबणीवर?

कोरोनाचा धोका पाहता आगामी आयपीएल पुढे ढकलली जाऊ शकते. त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे नागपुरात म्हणाले. स्पर्धा पुढे-मागे घेता येतील. माणसांचा जीव महत्त्वाचा आहे, असे टाेपे म्हणााले.अल्कोहोलने विषाणू मरत नाही...: 


कोरोना विषाणू अल्कोहोलने नष्ट होतो असा दावा करणारे काही मेसेज सध्या सोशल मीडियावर  फिरत आहेत. मात्र, हा दावा खोटा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. बातम्या आणखी आहेत...