आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Virus | India Has Registered The Second Confirmed Case Of Death Due To Novel Corona Virus 69 Years Old Woman Death

देशात कोरोनाचा दुसरा बळी: दिल्लीत ६९ वर्षीय महिलेचे निधन; परदेशातून परतलेल्या मुलापासून झाल होता संसर्ग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • १२ राज्यांत शाळा बंद, आयपीएल लांबणीवर; अमेरिकेत आणीबाणी
  • मास्क व सॅनिटायझरचा काळाबाजार केल्यास ७ वर्षांची कैद शक्य
  • मृत्यू राेखण्यात भारत प्रथम, १३१ देशांमध्ये व्हायरस, युरोप हे कोरोनाचे केंद्र : डब्ल्यूएचओ

नवी दिल्ली/बंगळुरू/मुंबई - काेराेना व्हायरसमुळे देशात दुसरा बळी गेला आहे. दिल्लीत ६९ वर्षीय महिलेचा गुरुवारी मृत्यू झाला हाेता. शुक्रवारी ती कोरोनाग्रस्त असल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली. तिला परदेशातून परतलेल्या मुलापासून संसर्ग झाला होता. मात्र, विमानतळावर स्कॅनिंगमध्ये मुलाला व्हायरसचे निदान झाले नव्हते. दरम्यान, अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रात्री उशिरा राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली. अमेरिकेत कोरोनामुळे ४० जणांचा मृत्यू झाला आहे.हरियाणा, महाराष्ट्रात नवीन रुग्ण आढळल्याने रुग्णांचा आकडा ८१ वर गेला. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेशसह १२ राज्यांत शाळा-कॉलेज बंद केले आहेत. तथापि, परीक्षा होत राहतील. महाराष्ट्राच्या ५ शहरांत, सिनेमागृहे, पब व नाइट क्लबही बंद राहतील. केंद्राने काळाबाजार रोखण्यासाठी मास्क व सॅनिटायझरचा अत्यावश्यक वस्तूंत समावेश केला. या वस्तूंचे उत्पादन, गुणवत्ता व वितरण सरकारच्या नियंत्रणात असेल. नियम मोडल्यास ७ वर्षांच्या कैदेची तरतूद आहे. भारताची सज्जता अशी : येत्या ३० मार्चपर्यंत श्रीलंका, फ्रान्स व जर्मनीची विमान उड्डाणे रद्द


> लखनऊत १५ व काेलकात्यात १८ मार्चला द. आफ्रिकेविरुद्ध होणारे वनडे सामने रद्द करण्यात आले आहेत. आधी हे दोन्ही सामने प्रेक्षकांविनाच खेळवण्याची तयारी करण्यात येत होती.

> आयपीएल आता २९ मार्चऐवजी १५ एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. स्पर्धा १८ दिवस उशिराने सुरू होईल. 

> सुप्रीम काेर्ट १६ मार्चपासून फक्त महत्त्वाच्या खटल्याची सुनावणी करेल. वकील व पक्षकारांनाच कोर्टात जाता येईल. 

> जेएनयूच्या सर्व वर्ग, परीक्षा आणि प्रायाेगिक वर्ग ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहेत. तथापि, कार्यालये सुरू राहतील. जामिया िमलिया इस्लामिया विद्यापीठातही वर्ग बंद असतील.३ एप्रिलपर्यंत चालणारे संसद अधिवेशन १८ मार्चलाच गुंडाळण्याची शक्यता, मोदींना पत्र 

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही लवकरच गुंडाळले जाऊ शकते. नरेंद्र जाधवांसह ३ खासदारांनी मोदींना पत्र लिहून सत्र संपवण्याची मागणी केली. सूत्रांनुसार, ३ एप्रिलपर्यंत चालणारे अधिवेशन १८ मार्चलाच गुंडाळण्यात येऊ शकते. 

> विदेशातून आलेले ७ संशयित बेपत्ता: ते पंजाबमध्ये आले होते. या संशयितांचा पोलिस कसून शोध घेत आहेत. 

> इराणहून ४४ जण भारतात: विमान मुंबई विमानतळावर एकांतात पार्क केले आहे. सर्वांना राजस्थानच्या जैसलमेरमधील विलगीकरण केंद्रात पाठवले जाणार असल्याचे म्हटले जाते.

> माेदींनी सार्क देशांना धोरण आखण्याचे आवाहन केले: म्हणाले, ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करू.’मृत्यू राेखण्यात भारत प्रथम, १३१ देशांमध्ये व्हायरस, युरोप हे कोरोनाचे केंद्र : डब्ल्यूएचओ

> चीनमध्ये तब्बल ३,१७६ बळी गेले आहेत. शुक्रवारी चीन सरकारने कोरोनावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे.

> चीननंतर इटलीत सर्वाधिक १,२२६ जणांचा मृत्यू झाला आहे. 
70,733 आजारमुक्त 


5,123 लोकांचा मृत्यू


1,40,049 जणांना संसर्ग

देश    मृत्युदर


अमेरिका    5.9%


चीन    3.8%*

इटली    3.8%

इराण    2.6%

फ्रान्स    1.6%

इंग्लंड    1.2%

भारत    0.2%

चीनच्या आकड्यांवर जगभरातील संस्था संशय घेत आहेत.