आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे 106 जणांचा मृत्यू, 4,515 संक्रमित, 976 जणांची प्रकृती गंभीर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १०६ झाली आहे. मंगळवार पर्यंत ४ हजार ५१५ जणांना संसर्ग झाल्याची माहिती चीनच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यापैकी ९७६ जणांची प्रकृती गंभीर आहे. ६० जणांना सोमवारपर्यंत रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती.  तिबेट प्रांतात अद्याप कोरोना विषाणूची बाधा झालेला एकही व्यक्ती आढळून आलेला नाही. चीनमध्ये वुहान हे कोरोनाच्या संसर्गाचे केंद्र बनले आहे. त्याशिवाय जर्मनीतही काही रुग्ण संशयित आढळले.  मलेशिया, दक्षिण कोरिया, फ्रान्स, व्हिएतनाम, कॅनडा, आयव्हरी कोस्ट व नेपाळमध्येही संसर्ग झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. अमेरिकेने मंगळवारी नागरिकांना चीनमध्ये जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. आतापर्यंत चीनच्या बाहेर कोरोनामुळे एका बाधिताचा मृत्यू झाला नाही. भारताने मोठ्या प्रमाणात खबरदारी घेताना सीमेवर तपासणी कक्ष स्थापन केले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...