आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार नवनीत कौर राणा मास्क घालून संसदेत दाखल; देशात आतापर्यंत कोरोनाचे 28 रुग्ण आढळले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात कोरोनाचे 28 रुग्ण, राज्यात अद्याप एकही रुग्ण सापडला नाही

नवी दिल्ली/हैदराबाद- चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत सर्वत्र पसरली आहे. अनेक देशांना आपल्या विळख्यात घेणारा कोरोना आता आपल्या भारतातही दाखल झाला आहे. देशात आतापर्यंत 28 कोरोना ग्रस्त रुग्ण आढळले आहेत. देशाच्या राजधानीत कोरोनाचे काही रुग्ण आढळल्याने तेथील नागरिक योग्य ती काळजी घेत आहेत.


यातच खासदार नवनीत कौर राणा आज(बुधवार) संसदेत मास्क घालुन आल्याचे दिसले. यादरम्यान त्यांच्या स्टाफनेही मास्क घातले हाते. कोरोनामुळे दिल्लीतील 5 शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. दिल्लीतील अरिवंद केजरीवाल सरकार 3.5 लाख एन 95 मास्कची व्यवस्था करत आहे.

देशात कोरोनाचे 28 रुग्ण, राज्यात अद्याप एकही रुग्ण सापडला नाही


जगासह भारतातही लोकांची झोप उडवणाऱ्या कोरोना व्हायरसपासून महाराष्ट्र अजुनही सुरक्षित असल्याचा दावा सरकार करत आहे. राज्यात आतापर्यंत कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण सापडलेला नाही अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. राज्यात पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नका असा सल्ला देखील यावेळी त्यांनी दिला.

भारतात आढळले 28 रुग्ण


भारतात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषद घेऊन 28 रुग्णांची औपचारिक माहिती दिली. इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या तपासासाठी तेथेच एक लॅब तयार केली जाणार आहे. सोबतच, भारतात परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाची स्क्रीनिंग केली जाणार आहे.


यापूर्वी केवळ 12 देशांतून येणाऱ्यांच्या चाचण्या घेतल्या जात होत्या अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली. त्यातच बुधवारी इटलीचे 14 पर्यटक संशयित रुग्ण असल्याचे समोर आले. या सर्वांना आयटीबीपीच्या कॅम्पमध्ये ठेवले आहे.