आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत करण्यात आले कोरोनारूपी होळीचे दहन, यामुळे कोरोना व्हायरस नष्ट होण्याची लोकांना अपेक्षा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जगभरात सध्या कोरोना या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. याचे सावट यंदाच्या होळी उत्सवावरही पडले आहे. सोमवारी मुंबईतील वरळी येथे कोरोनारूपी होळीचे दहन करण्यात आले. कोरोनासुराची होळी केल्याने कोरोना व्हायरसचा नष्ट होईल अशी अपेक्षा लोकांमध्ये आहे. 

देशात आतापर्यंत 45 प्रकरणे आली समोर 


आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते, देशात आतापर्यंत कोरोना व्हायरसचे 45 प्रकरणे समर आली आहेत. यातील तीन पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले. नवीन प्रकरणे दिल्ली, यूपी, केरळ आणि जम्मू-काश्मीर येथील आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)च्या नवीन आकडेवारीनुसार जगभरात आतापर्यंत कोरोना संसर्गाच्या 2,241 नवीन प्रकरणांची पुष्टी करण्यात आली आहे. तर संसर्गित लोकांची संख्या 95,333 वर पोहोचली आहे. 

बातम्या आणखी आहेत...