आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक लाखांपेक्षा जास्त मास्क धुवून पुन्हा विक्री करण्याची होती तयारी, पकडण्याच्या भीतीने फेकले कचऱ्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रदुषण नियंत्रण बोर्ड, आरोग्य विभाग आणि पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत
  • परदेशातून लाखोंच्या संख्येने मास्क मागवल्याचा केला जातोय दावा

मुंबई - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असतानाचा मुंबईत एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. व्हायरसपासून बचाव होण्यासाठी वापरण्यात येणारे तब्बल एक लाख मास्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आलेत. या मास्कला धुवून पुन्हा विक्रीसाठी आणण्याची तयारी केली जात होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाजारात मास्कची मागणी वाढली आहे. यामुळे बाजारात या मास्कची महागड्या दराने विक्री केली जात आहे. भिवंडीत रस्त्याच्याकडेला एका पाइपलाइनजवळ हे मास्क फेकले होते. अन्न विभाग, प्रदुषण नियंत्रण बोर्ड, आरोग्य विभाग आणि पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कचऱ्यात फेकले मास्क 


अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे सर्व मास्क वापरल्यासारखे दिसत आहेत. याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये हे मास्क एका ठिकाणी उन्हात वाळवताना दिसत आहेत. मात्र पकडल्या जाण्याच्या भीतीने सर्व मास्क कचऱ्यात फेकून दिले होते. दरम्यान परदेशातून लाखोंच्या संख्येने मास्क मागवले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे सर्व मास्क भिवंडीच्या दोपाडा भागातील एक गोदामात ठेवले होते. जेव्हा पोलिस गोदामात पोहोचले तेव्हा त्यांना तेथे काहीही सापडले नाही.भिवंडीचे डीएसपी राजकुमार सिंह यांनी सांगितले की, 'या मास्कविषयी आम्ही तपास करत आहोत. सध्या एक लाखांवर हे मास्क असल्याची शक्यता आहे.'

 

बातम्या आणखी आहेत...