आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Virus: Narendra Modi Govt On Coronavirus In India Latest Updates, More Than 10 Lakh Passengers Screened At Indian Airports

दिल्लीत 31 मार्चपर्यंत सर्व सिनेमा गृह बंद, मोदी म्हणाले- येणाऱ्या काळात कोणताच केंद्रीय मंत्री परदेशात जाणार नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉ. हर्षवर्धन म्हणाले- सर्व राज्यांकडून विस्तृत रिपोर्ट घेत आहोत, एअरपोर्ट्सवर स्क्रीनिंगमध्ये कोणताच हलगर्जीपणा नाही

नवी दिल्ली- भारतात कोरोना व्हायरसचे आतापर्यंत 75 प्रकरणे समोर आली आहेत. दिल्लीमध्ये संक्रमण वाढण्याच्या भीतीमुळे मुख्यमंत्री केजरीवालांनी गुरुवारी 31 मार्चपर्यंत सर्व सिनेमा गृह बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या शाळा आणि कॉलेजामध्ये परीक्षा होत नाहीयेत, त्यांनाही 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आले आहेत. यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनामुळे घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. संक्रमाणामुळे येणाऱ्या काळात कोणताच केंद्रीय मंत्री परदेशी दौऱ्यावर न जाण्यास सांगितले आहे.

यावेळी ते म्हणाले की, माझी नागरिकांना अपील आहे की, कोणीच सध्या परदेशी दौऱ्यावर जाऊ नये. तसेच, मोठ्या कार्यक्रमात जाण्यास टाळावे. सरकार या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. सर्व राज्यांनाही आम्ही सुरक्षेच्या दृष्टीकोणातून योग्य पाऊले उचलण्यास सांगितले आहे. इराणमधून भारतीयांना परत आणण्यासाठी दोन विमान पाठवण्यात आले आहेत. पहिला विमान 13 मार्च आणि दुसरा 15 मार्चला रात्री पाठवण्यात येईल. आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, आतापर्यंत देशाच्या अनेक विमानतळावर परदेशातून आलेल्या 10 लाख 57 हजार 506 नागरिकांची स्क्रीनिंग झाली आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी 35 हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. संक्रमित रुग्णांना ट्रॅक करण्यासाठीही योग्य पाऊले उचलली जात आहेत. आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लोकसभेत सांगितले की, राज्यांकडून रोज विस्तृत रिपोर्ट घेतली जात आहे. यात कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. विमानतळावरही स्क्रीनिंग केली जात आहे. 17 जानेवारीला 7 विमानतळांपासून सुरू झालेली स्क्रीनिंग आता देशभरातील 30 पेक्षा जास्त विमानतळांवर होत आहे. यावेळी त्यांनी सर्व खासदारांना आपल्या मतदारसंघात कोरोना व्हायरसबद्दल जागरुकता पसरवण्याची विनंती केली.

51 लॅब आणि 56 कलेक्शन सेंटर बनवले

हर्षवर्धन यांनी सांगितल्यानुसार, देशभरात कोरोनाच्या चाचणीसाठी 51 लॅब आणि 56 कलेक्शन सेंटर बनवले आहेत. 100 कोऑर्डिनेशन सेंटर आहेत. इराणमध्ये चाचणीसाठी उपकरणे नसल्यामुळे भारताकडून त्यांना उपकरणे पाठवली जातील. भारत सरकारने चीनमधून सर्व भारतीयांना परत आणले आहे, आता फक्त इराणमध्येच भारतीय नागरीक आहेत. त्यांनाही लवकरात लवकर भारतात आणले जाईल.

बातम्या आणखी आहेत...