आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये नवीन प्रकरणे घटली, ११ रुग्णालये बंद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वुहानच्या शेवटच्या अस्थायी रुग्णालयास बंद करण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. - Divya Marathi
वुहानच्या शेवटच्या अस्थायी रुग्णालयास बंद करण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

वुहान - वुहानमध्ये रुग्णांवरील उपचारासाठी तयार करण्यात आलेल्या ११ रुग्णालयांना बंद करण्यात आले आहे. ते बंद करण्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी आरोग्य कर्मचारी व रुग्ण एकत्र आले होते. चीनमध्ये नवीन बाधितांच्या संख्येत घट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. वुहान वगळता गेल्या दोन दिवसांत नवीन प्रकरण समोर आले नाही. वुहानमध्ये काही महत्त्वाच्या उद्योगांना पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी कोरोनाच्या संसर्गानंतर पहिल्यांदाच वुहानचा दौरा केला व  कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. दुसरीकडे जगभरात १२० देशांत कोरोना पोहोचला आहे. त्यामुळे आतापर्यंत १ लाख १९ हजार लोकांना संसर्ग झाला. ४ हजार ३६० जणांचा मृत्यू झाला.
> चीनमध्ये गेल्या २४ तासांत केवळ वुहान वगळता इतरत्र संसर्गाचे नवीन प्रकरण नव्हते
> जगातील १२० देशांत कोरोनाचा संसर्ग, आतापर्यंत ४३०० जणांचा मृत्यू

बातम्या आणखी आहेत...