आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Corona Virus : Pakistani Students Says Pakistan Government Should Learn Something From India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानी विद्यार्थी म्हणाले - पाक सरकारने भारताकडून काही शिकावे, आम्हाला येथे मरण्यासाठी सोडले; सरकारला लाज वाटली पाहिजे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाकिस्तानी सरकारने चीनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची मदत करण्यास दिला नकार
  • पाकिस्तानी दूतावास आमचा फोन देखील उचलत नाही - विद्यार्थी
  • वैद्यकीय सेवा नसल्याने विद्यार्थ्यांना चीनमधून बाहेर काढता येणार नाही - पाकिस्तानी राजदूत

वुहान/इस्लामाबाद - भारताने शनिवार आणि रविवारी दोन विमानांनी चीनच्या वुहानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना मायदेशी परत आणले. यानंतर वुहानमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी एक व्हिडिओ जारी करत इमरान सरकारवर निशाणा साधला आहे. एका व्हिडिओद्वारे विद्यार्थी म्हणाले की, "लवकरच बांगलादेश सुद्धा आपल्या लोकांना चीनमधून बाहेर काढणार आहे. यानंतर फक्त आम्ही पाकिस्तानी येथे अडकून राहू. कारण आमच्या सरकारचे म्हणणे आहे की, तुम्ही मृत असला, तुम्हाला संसर्ग झाला असेल किंवा तुम्ही ठीक असाल, आम्ही आमच्या लोकांना चीनमधून बाहेर काढणार नाहीत. पाकिस्तान सरकारला लाज वाटायला हवी. त्यांनी भारताकडून काही शिकायला हवे."

पाकिस्तानी सरकारने विद्यार्थ्यांची मदत करण्यास दिला नकार


पाकिस्तानी सरकारने शुक्रवारी म्हटले होते की, या बिकट परिस्थितीत आम्ही चीनसोबत ठामपणे उभे आहोत आणि त्यामुळे आम्ही आमच्या नागरिकांना वुहानमधून बाहेर काढणार नाही. पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी म्हटले होते की, "आजाराच्या प्रसाराविषयी पैगंबर मोहम्मद यांचे निर्देश आजही एक उत्तम मार्गदर्शक आहेत. तुम्ही जर रोग पसरत असलेल्या ठिकाणी असाल तर ते ठिकाणी मुळीच सोडू नका. उलट आपल्याला तेथे अडकलेल्यांना आपण मदत करायला पाहिजे."
 

एका दुसऱ्या व्हिडिओत पाकिस्तानी विद्यार्थी म्हणतात की, "आमचे विद्यापीठ वुहानपासून 2-3 तासांच्या अंतरावर असलेल्या शांज्यांग येथे आहे. पाकिस्तानमधील लोक हे विसरतात की चीनमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. आमची कोणीही मदत करत नाहीयेत. चीन सरकारने आम्हाला दूतावासास संपर्क करण्यास सांगितले. पण आमचे दूतावास म्हणाले की, 'मृत्यू अल्लाहच्या हातात आहे, मग तो येथे येईल किंवा तेथे येईल.'' दुसऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, "आम्हाला विद्यापीठातून भोजन दिलं जात असल्याच्या बातम्या पाकिस्तानी माध्यमात आल्या आहेत. पण ते सर्व खोटं आहे. आमच्याकडे फक्त आमचेच जेवण शिल्लक आहे. येथील दुकानांत जेवण महाग आहे. भाज्या सोन्याच्या दराने मिळाल्यास आम्ही काय करणार. पाकिस्तानी दूतावास आमचे फोन सुद्धा उचलत नाहीत."

वैद्यकीय सेवेच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांना तेथून बाहेर काढता येणार नाही - पाकिस्तानी राजदूत


दुसरीकडे चीनमध्ये पाकिस्तानच्या राजदूत नगमाना हाशमी यांनी जिओ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, पाकिस्तानमध्ये स्थानिक वैद्यकीय सुविधा नाहीत. अशात आम्ही विद्यार्थ्यांना चीनमधून बाहेर काढू शकत नाही. हाशमी म्हणाल्या की, वुहानमधील अन्न कमतरतेमुळे काही विद्यार्थी नाराज आहेत. आम्ही लवकरच हुबेई प्रशासनाशी संपर्क साधून त्यांच्या समस्या दूर करू.