आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Virus |Primary School Closed In Delhi Till March 31; Two Patients Were Found In Gurugram, Ghaziabad

दिल्लीत ३१ मार्चपर्यंत प्राथमिक शाळा बंद; गुरुग्राम, गाझियाबादमध्ये दोन रुग्ण आढळले

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जगभर ७७ देशांत पसरलेल्या काेरोना विषाणूने (कोविड-१९) मृत्यू पावलेलया रुग्णांची संख्या गुरुवारी ३,३०८ पर्यंत गेली. भारतात असे ३० रुग्ण आढळले आहेत. गाझियाबादमध्ये इराणहून परतलेल्या एका व्यक्तीला ही विषाणूबाधा झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, दिल्लीत सावधगिरीचा उपाय म्हणून प्राथमिक शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर, पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेल्जियम दौरा रद्द केला. इटलीमध्ये झालेल्या या रोगाच्या फैलावातून बोध घेत भारताने इटली व द. कोरियातून येणाऱ्या लोकांना कोरोनामुक्त असल्याचे प्रमाणपत्र घेऊन येणे बंधनकारक केले आहे. दरम्यान, मध्य प्रदेशात आयोजित आयफा पुरस्कार सोहळा स्थगित करण्यात आला आहे.

भास्कर विशेष : रुग्ण ज्या भागात गेला असेल त्या ३ किमी अंतरात घरोघर जाऊन करणार स्क्रीनिंग
 

नवी दिल्ली - कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता हे रुग्ण ज्या भागात गेले असतील त्या ३ किमी परिसरातील लोकांची स्क्रीनिंग करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कुणी संशयित आढळलाच तर सॅम्पल घेतले जातील. आरोग्य मंत्रालयाने प्रत्येक सचिवाकडे दोन-तीन राज्यांची जबाबदारी दिली असून लोकांना माहितीसाठी हेल्पलाइन नंबर ०११-२३९७८०४६ दिला आहे.