आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे, नागपूर, नाशकात संशयित निगराणीखाली; काेराेनाच्या धास्तीने शाळांना सुटी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - काेराेना विषाणूचे संशयित रुग्ण पुणे शहरात आढळून आल्याने या राेगाचा फैलाव आणखी वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांनी पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. तसेच याबाबत अंमलबजावणी करण्यासाठी पुणे जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डाॅ. अशाेक नंदापूरकर व जिल्हा परिषदेचे जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ.भगवान पवार यांची संनियंत्रक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. कोरोनाची लागण झालेल्या ५ पैकी ४ जणांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, एकूण १७ पैकी १० जणांचे अहवाल रात्री येण्याची शक्यता आहे, तर एकाला सौम्य लक्षणे आढळून आली आहेत.काेराेना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता लघु कृती प्रमाणित कार्यपध्दती तयार करण्यात येत आहे. विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात वाढू नये यासाठी उपाययाेजना आखणी केली जात आहे. स्वतंत्र वैद्यकीय पथके पूर्णवेळ तैनात करण्यात येत आहेत. संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. काेराेना विषाणूच्या माहितीसाठी स्वतंत्र माहिती कक्ष व मदत केंद्राची स्थापना केली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी राष्ट्रीय काॅल सेंटर क्रमांक ९१११२३९७८०४६ आणि १०४  क्रमांक कार्यान्वित करण्यात आले आहेत. विमानतळावरून प्रवाशांबद्दलची माहिती आराेग्य विभागास उपलब्ध हाेते. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील रुग्णांचा शाेध घेऊन त्यांना निरीक्षणाखाली ठेवले जाणार आहे. औषध विक्रेत्यांनी जास्त भावाने मास्क विक्री, औषधांची साठेबाजी केल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवार्इ केली जाणार असून चुकीचे समज व मेसेज पसरविणाऱ्यांवर कारवार्इ केली जार्इल. खासगी डाॅक्टरांची सेवा तसेच रुग्णालयातील साधनसामग्री अधिग्रहित करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला याद्वारे मिळालेले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील कलम ३० अन्वये सदर आदेश दिल्याने त्याचे पालन करणे संबंधितांना  बंधनकारक आहे. त्याचे पालन करण्यात बाधा निर्माण करणाऱ्यांवर कायद्याचे कलम ५१ नुसार गुन्हा दाखल होईल.आरटीओतील तीन जणांची तपासणी : बुधवारी संबंधित पाच रुग्णांपैकी ४ जणांची  प्रकृती स्थिर असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले. गेल्या दहा दिवसांत संबंधित पाचजण ज्या ज्या व्यक्तींना भेटले त्यांची चाैकशी करून तपासणी केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. टॅक्सीचालक पुणे आरटीआेत जाऊन तीन क्लार्कला भेटला असल्याने संबंधित ३ जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पिंपरीत काेराेना संशयित महिला कुटुंबातील ८ जणांना दाखल केले

पिंपरी-चिंचवडमध्ये एक काेराेना संशयित महिला आढळली असून संबंधित महिला २७ फेब्रुवारी राेजी दुबर्इहून पुण्यात आली हाेती. त्यानंतर तिला ताप, खाेकला, सर्दीचा त्रास जाणवू लागल्याने तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यात काेराेना आजाराची लक्षणे आढळून आली. त्यामुळे तिला नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून तिच्या कुटुंबातील आठ व्यक्तींनाही नायडू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. पुणे विद्यापीठाला सुटीची समाजमाध्यमावर अफवा

काेराेना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांना २० ते ३० मार्चदरम्यान सुटी जाहीर केली असल्याचे संदेश असलेले निवेदन साेशल मीडियावर फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत विद्यापीठाचे कुलसचिव यांनी सदर निवेदन चुकीचे असून महाविद्यालयांना सुटी देण्याबाबत काेणत्याही प्रकारचे निवेदन विद्यापीठाने प्रसिध्द केले नसल्याचे स्पष्ट केले आहे. काेणीतरी खाेडसाळपणाने हे निवेदन साेशल मीडियावर पसरवले आहे.मुंबई विमानतळावर ४० जणांची तपासणीच नाही?

एका नामांकित ट्रॅव्हल्स कंपनीच्या माध्यमातून चाळीस जणांचा एक गट २० ते २९ फेब्रुवारीदरम्यान दुबईला फिरण्यास गेला हाेता. यात यवतमाळचे १०, पुण्याचे ५, पिंपरी-चिंचवडचे ३, बीडचे ३, अहमदनगरचे ४, नागपूरचे ३ तर रायगडचे २ जणांचा समावेश आहे. मुंबई विमानतळावर प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नव्हती. त्यानंतर संबंधित प्रवासी आपआपल्या घरी गेले.  पुण्यातील कुटुंबीय ‘आेला’ या खासगी कारने घरी परतले हाेते. एका आठवड्याने त्यांना त्रास हाेऊ लागल्याने त्यांनी तपासणी केली असता दाेन जणांना कोराेनाची लागण झाली. 
 
 
 
काेराेनाच्या धास्तीने शाळांना सुटी


पुण्यात सापडलेल्या काेराेना रुग्णांच्या साेसायटी परिसरात नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी संबंधित ठिकाणापासून दुसरीकडे काही दिवस वास्तव्य करण्यास प्राधान्य दिले आहे. दरम्यान, नांदेड सिटीमधील विद्या प्रतिष्ठानचे पवार पब्लिक स्कूल, नांदेड सिटी पब्लिक स्कूल यांना रविवारपर्यंत शाळा प्रशासनाने सुटी जाहीर केली आहे, तर सिंहगड रस्त्यावरील डीएसके शाळेलादेखील ४ दिवस सुटी देण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...