आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली, हैदराबाद, जयपुरात आढळले कोरोनाचे ३ रुग्ण

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्ली, हैदराबाद व जयपुरात कोरोना व्हायरसचा (काेव्हिड-१९)  प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, दिल्लीतील रुग्ण इटलीहून तर हैदराबादचा रुग्ण दुबईहून परतला होता. दोघांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत. दरम्यान, जयपुरात आढळलेला रुग्ण इटलीचा नागरिक आहे. देशात सर्वात आधी केरळात संसर्गाची ३ प्रकरणे आढळली होती. ते तिघेही आता या आजारातून बरे झाले आहेत. चीन व जपानच्या क्रुझहून आणलेल्या भारतीयांना मानेसर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. कुणालाही त्यांची भेट घेण्याची परवानगी नाही. देशातील २१ मोठ्या विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग केली जात आहे. आजवर ५.५७ लाखांपेक्षा जास्त प्रवाशांची चाचणी झाली आहे. तसेच १२ मोठ्या व ६५ छोट्या बंदरांवरही नजर ठेवली जात आहे. दरम्यान, ६६ देशांतील कोरोनाच्या बळींचा आकडा ३ हजारांवर गेला आहे. ८८ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनाने ग्रस्त आहेत. सेन्सेक्स पुन्हा गडगडला

देशात नव्या रुग्णांची माहिती येताच सेन्सेक्स १२१४ अंकांनी गडगडला. त्याआधी सेन्सेक्स ३९,०४६ अंकांवर होता. ३.१५ वाजता तो ३७,८३२ अंकांपर्यंत कोसळला. नंतर सावरून तो ३८,१४४ अंकांवर बंद झाला.
 

बातम्या आणखी आहेत...