आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याची शक्यता, बीसीसीआय सुत्रांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क - कोरोना व्हायरसमुळे जगभरात दहशत पसरली आहे. कोरोना संसर्गजन्य रोग असल्याने गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. दरम्यान कोरोनाचा परिणाम क्रीडा क्षेत्रावरही दिसून येत आहे. कोरोनाच्या सावटामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा पुढे ढकलली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशी माहिती बीसीसीआय सुत्रांकडून मिळत आहे. 




कोरोना व्हायरसमुळे यावर्षीची आयपीएस स्पर्धा पुढे ढकलली जाईल असे बीसीसीआयच्या सुत्रांकडून समजते आहे. दरम्यान आयपीएलला अजुन वेळ आहे. याबाबत आतापर्यंत कोणताही निर्णय झाला नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवत आहोत. यासाठीच्या सर्व खबरदारी घेणार असल्याचे बीसीसीआयच्या सुत्रांनी सांगितले. दरम्यान, कोरोनामुळे इटलीतील  फुटबॉल लीग सीरी-ए आणि अमेरिकेतील इंडियन वेल्स टेनिस टूर्नामेंट रद्द करण्यात येणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...